आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Elgar For The Alcohol Ban, Woman On Way In Jalgaon

दारूबंदीसाठी एल्गार, रास्‍ता रोकाे नंतर दाेन दिवसांत कारवाईचे पाेलिसांकडून अाश्वासन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- बिहारमध्येमुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दारूबंदी करण्याची घाेषणा करताच महाराष्ट्रातही दारूबंदी करण्याच्या मागणीला जाेर चढू लागला अाहे. यापूर्वीही राज्यात ठिकठिकाणी अांदाेलन व्हायचे, मात्र अाता दारुबंदीच्या मागणीसाठी महिला अधिक अाक्रमकपणे पुढे येत असल्याची प्रचिती रविवारी जळगाव जिल्ह्यात अाली.
जुगार दारूच्या व्यसनामुळे देशोधडीला लागलेली कुटुंबे, व्यसनाधिनतेमुळे बिघडत चाललेली तरुणाई, काहींचे झालेले मृत्यू या प्रकारामुळे संतप्त झालेल्या बांभाेरी येथील सुमारे दाेनशे संतप्त महिलांनी रविवारी नागपूर-मुंबई महामार्गावर दाेन तास रास्ता राेकाे अांदाेलन केले. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची काेंडी झाली हाेती. दाेन दिवसांत गावात दारुबंदीचे करण्याचे अाश्वासन पाेलिसांनी दिल्यानंतरच अांदाेलन मागे घेण्यात अाले.

पाच हजार लोकसंख्या असलेल्या बांभोरी गावात अवैध गावठी दारूचे १२ अड्डे आहेत. त्या ठिकाणी जुगारही जाेरात चालताे. त्यामुळे अनेकांचे अायुष्य संसार उद‌््ध्वस्त झाली अाहेत. हे अवैध धंदे बंद करावीत या मागणीसाठी गावातील महिलांनी वेळाेवेळी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा अबकारी कार्यालयालाही निवेदने दिली मात्र, त्याची सरकार दरबारी कुठेही दखल घेण्यात अाली नाही. त्यामुळे अखेर संतप्त महिलांनी अांदाेलनाचा मार्ग स्वीकारला.

पोलिस हप्ते घेत असल्याचा आरोप....
दारूचेअड्डे जुगार बंद करण्यासाठी पाळधी पोलिसांना वारंवार विनंत्या केल्या. मात्र ते दारुवाल्यांकडून हप्ते घेतात, असा आरोप या महिलांनी केला. दरम्यान, अांदाेलक महिलांनी धरणगावचे पोलिस निरीक्षक गणेश कदम यांना घेराव घालून दारूसह अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली. त्यानंतर कदम यांनी गावकऱ्यांची बैठक घेऊन ‘दारू अड्ड्यांचे नकाशे द्या; कारवाई करतो’, असे आश्वासन दिले.

दोन महिन्यांत पाच जणांचे बळी
आठदिवसांपूर्वी बांभोरीचे माजी सरपंच भिकन शांताराम नन्नवरे यांचा अतिमद्यप्राशनाने मृत्यू झाला. तसेच पाच दिवसांपूर्वी हिरालाल गोविंद तायडे यांचाही दारूमुळे मृत्यू झाला. या गावात दारुने दोन महिन्यांत पाच जणांचे बळी घेतले. काही महिलांनी घरातील कर्ता पुरुष, तर काहींनी मुलगा दारूच्या व्यसनामुळे गमावला, अनेकांचे संसार देशाेधडीला लागले, अशा तक्रारी अांदाेलन महिलांनी केल्या.

पालकांनामारहाण, कर्जबाजारीही
गावातीलवृद्ध, पुरुष, युवक किशोरवयीन मुलेही दारूच्या आहारी गेली. पगार दारूच्या उधारीत संपून जातो. दारू उधारीच्या डायऱ्याही त्यांनी बनवलेल्या आहेत. तसेच दारूच्या व्यसनापायी अनेक जण कर्जबाजारी झालेले आहेत. व्यसनाधीन युवकांकडून आई-वडील पत्नीला मारहाणीचे प्रकार नित्याचेच झालेले आहेत, अशा व्यथाही काही महिलांनी मांडल्या.
अांदाेलक महिलांनी पाेलिस अधिकाऱ्यांनाही जाब विचारला.