आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Employees Have Been Sacked From Service Again Join Municipal Office

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोनवणे बंधूंसह चौघे बडतर्फ कर्मचारी पुन्हा महापालिकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- पालिकेच्या सेवेत असताना अवैध गौणखनिज उत्खनन तसेच बेकायदा प्रकरणात नावे आल्याने सेवेतून बडतर्फ करण्यात आलेले विलास सोनवणे, प्रल्हाद सोनवणे, संजय साळुंखे, नंदकिशोर सपकाळे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा ठराव स्थायी सभेत बहुमताने मंजूर करण्यात आला. विभागीय आयुक्तांनी संबंधितांचे अपील निकाली काढल्यावरही स्थायीत हा निर्णय घेण्यात आल्याने स्थायी सभापतींसह इतरांनी सावध पवित्रा घेतला होता.
महापालिकेच्या सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात शुक्रवारी सकाळी ११ वाजता स्थायी समितीची सभा झाली. व्यासपीठावर सभापती ज्योती चव्हाण, नगरसचिव निरंजन सैंदाणे होते, उपायुक्त प्रदीप जगताप होते. अजेंड्यावरील ते ५, ते १० आणि आयत्या वेळचे तीन विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. सहा नंबरचा विषय सोनवणे बंधूंसह चौघांना पुन्हा सेवेत घेण्याचा होता. या विषयासंदर्भात प्रशासनाचीही टिपण्णी पाहता सभापती ज्योती चव्हाण, ज्येष्ठ नगरसेवक नरेंद्र पाटील, सुनील माळी यांनी विरोध केला. तर नितीन लढ्ढा, संदेश भोईटे, राजू पटेल, नितीन बरडे, भागचंद जैन, अनिल देशमुख, लिना पवार, मुक्तार पठाण, रवींद्र मोरे, गणेश सोनवणे अशा १० नगरसेवकांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. अश्विनी देशमुख सभेला गैरहजर होत्या. तर मनसेचे ललित कोल्हे, संतोष पाटील यांनी रजेचा अर्ज पाठवला होता.
आयुक्तांवर आरोप- प्रत्यारोप
मार्केट गाळे कराराचे घोंगळे भिजत ठेवल्याने संतप्त नगरसेवकांचा आयुक्तांवर रोष दिसून आला. आयुक्तांमुळे शहराचे वाटोळे होत असल्याचा आरोप नगरसेवक अनिल देशमुख, राजू पटेल यांनी केला.