आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेहरूण तलावातील हद्दीच्या खुणाच अतिक्रमणधारकांनी केल्या नष्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मेहरूण तलाव परिसराच्या माेजणीसाठी मंगळवारी भूमी अभिलेख कार्यालयासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी गेलेले हाेते. मात्र, अतिक्रमणधारकांनी अस्तित्वात असलेल्या माेजणीच्या खुणांचे पुरावेच नष्ट केल्याची बाब निदर्शनास अाली. तसेच बिल्डर लाॅबीकडून वहिवाट तलाव क्षेत्रातील पाण्याच्या स्राेतांचे प्रवाह बदलण्यात अाले अाहेत. त्यामुळे अाता संपूर्ण क्षेत्र माेजावे लागणार असून, संबंधितांना नाेटिसा बजावल्या अाहेत.
माेजणीपूर्वी तलाठ्यांने मेहरूण परिसरातील शेतकरी बिल्डर्सना नाेटिसा बजावली हाेती. या वेळी काहीनी नाेटीस घेण्यास नकार दिल्याने त्यांच्या घरावर त्या डकवून पंचनामा करण्यात अाला अाहे. काहींनी स्वत: नाेटीस मागून घेतली अाहे.
शासकीय यंत्रणेकडून तलावाची माेजणी करण्यास सुरुवात करताच तलावाच्या पश्चिमेकडील बाजूने तीन युवकांनी खासगी माेजणीला प्रारंभ केला. थेट तलावात घसरलेल्या मुरूमवर त्यांनी लाइन टाकत हा प्लाॅट श्रीकांत खटाेड यांचा असल्याचा दावा करत प्लाॅटची हद्द निश्चित करीत असल्याचे सांगितले.
मनपाच्या पथकाची मदत
तलावाच्यामाेजणीसाठी भूमी अभिलेख विभागाने महापालिकेच्या नगररचना विभागाची मदत घेतली अाहे. त्यासाठी सहायक नगररचनाकार चंद्रकांत निकम, भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक सी.जी.माेहाेळकर, तलाठी वैशाली पाटील, महापालिकेचे अभियंते अरविंद भाेसले या वेळी उपस्थित हाेते.
पुरावे केले नष्ट
तलावाभाेवतीअसलेल्या जमिनी सर्व्हे नंबर यांच्या हद्द निश्चित करण्यासाठी दुर्बिण दगड, वरळी, बांध, दगडांची पिचिंग अादी खुणा निश्चित करण्यात अाल्या हाेत्या. मात्र, अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण करताना सर्वात अाधी या खुणांचे पुरावे नष्ट केले अाहेत. त्यासाठी महापालिकेचे अाजी-माजी अभियंते कर्मचाऱ्यांची मदत घेतली गेल्याचा संशय व्यक्त केला जात अाहे.
वहिवाटनुसार मोजणीचा पर्याय : एखाद्याजमिनीचे मोजमाप करताना अभिलेख नोंदींना प्राधान्य देण्यात येते. मात्र, त्यानुसार खुणा आढळून आल्यामुळे मेहरूण तलावाची मोजणी वहिवाटीनुसार करण्याचा निर्णय भूमिअभिलेख विभागाने घेतला.
गुन्हा दाखल करणे शक्य
तलावाचेक्षेत्रफळ माेजण्यासाठी तलावाभाेवतीचे क्षेत्र माेजणे अावश्यक अाहे. हे क्षेत्र माेजत असताना काही ठिकाणी हद्दीचे पुरावे खुणा नष्ट करणे, नैसर्गिक स्राेतांचे प्रवाह बदलण्याचे प्रकार लक्षात अाल्यास भूमी अभिलेख विभाग संबंधितांवर गुन्हा दाखल करू शकते. तसेच माेजणीच्या कामात अडथळा निर्माण करणे अथवा पुरावे नष्ट केल्याचा प्रकार घडल्यास पंचनामा करून कारवाई हाेऊ शकते.
सभाेवतालचे क्षेत्र माेजणार : तलावालालागून असलेले सर्व्हे नंबर, शेत प्लाॅट यांची हद्द काेठून अाहे, याबाबत खुणा अथवा पुरावे नाहीत. त्यामुळे पूर्व अाणि दक्षिणेकडील तलावापासून दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाच्या शेतापासूनचे, तर दुसरीकडे माेहाडी रस्त्यापासूनचे क्षेत्र माेजले जाईल.