आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झोपडपट्टी धारकांना तीन दिवसांचा अल्टिमेटम, पिंप्राळा हुडकोत अतिक्रमण काढायला गेलेले पथक माघारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- पिंप्राळा-हुडको मधीलगट नंबर 214 वरील झोपडपट्टीधारकांनी केलेले अतिक्रमण काढण्यासाठी गेलेले पालिकेचे पथक रिकाम्या हाती परतले. मात्र, तीन दिवसांत संबंधितांनी स्वत:च अतिक्रमण काढल्यास पालिकेचे पथक पुन्हा त्या ठिकाणी जाणार आहे. दरम्यान, झोपडपट्टीचे अतिक्रमण काढण्याची धडपड करणा-या पालिकेचे शहरातील मुख्य रस्त्यांच्या दोन्ही बाजूला असलेल्या अतिक्रमणांकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. पिंप्राळा-हुडको भागात दांडेकरनगरसह घरकुल मंजूर असलेल्यांना तात्पुरती जागा देण्यात आली होती. त्या जागेवर घरकुल उभारणी करावयाची असल्याने संबंधितांनी केलेले अतिक्रमण अडथळा ठरत होते. त्यामुळे पालिकेच्या पथकाने सोमवारी घटनास्थळी जाऊन कारवाईला सुरुवात केल्यावर नगरसेवक राजू पटेल यांनी मध्यस्थी केली. या वेळी कुठलाही वाद चिघळता १० ते १५ जणांनी अतिक्रमण काढून घ्यायला सुरुवात केली. तसेच इतरांनीही तयारी दर्शवल्याने तीन दिवसांची मुदत मागून घेतली. मात्र, गुरुवारपर्यंत संबंधितांनी स्वतच काढल्यास पालिकेची यंत्रणा हे अतिक्रमण काढणार अाहे. दरम्यान, शहरातील दाणाबाजार, नेहरू चाैक ते भिलपुरासह मुख्य रस्त्यांच्या दाेन्ही बाजूला असलेल्या अतिक्रमणांकडे मात्र पालिकेतर्फे दुर्लक्ष केले जात अाहे.
तासाभरातपरतला ताफा
हुडकोतीलगट नंबर २१४ या ठिकाणी पूर्व-पश्चिम विकास योजनेच्या रस्त्यावरील बिल्डिंग नंबर १५ समोर असलेल्या जागेवर झालेले अतिक्रमण काढण्यासाठी मनपा अधिकारी कर्मचा-यांचा मोठा फौजफाटा नियुक्त केला होता. उपअभियंता सुनील भोळे, नगररचना सहायक संजय पाटील, कनिष्ठ अभियंता फिरोज काझी, प्रसाद पुराणिक, मनीष अमृतकर, प्रकाश पाटील, शाखा अधिकारी िवलास सुर्वे अतिक्रमण अधीक्षक इस्माईल शेख यांच्यासह अतिक्रमण विभागाचे कर्मचारी घटनास्थळी गेले होतो. मात्र, नगरसेवक राजू पटेल यांनी मध्यस्थी करत मुदत मागून घेतल्याने हा ताफा परतला. पिंप्राळा येथे अतिक्रमण काढताना महापालिकेचे पथक.

काय आहे प्रकरण ?
पालिकादूध फेडरेशन समोरील रेल्वेलाइनलगत असलेल्या झोपडपट्टीधारकांसाठी पिंप्राळा शिवारात घरकुल याेजना राबवत अाहे. केंद्र सरकारच्या आयएचएसडीपी याेजनेंतर्गत सुरू असलेल्या या कामात ४७२पैकी पहिल्या टप्प्यात २६० घरकुलांचे बांधकाम पूर्ण करण्यात अाले अाहे. काम पूर्ण होईपर्यंत त्या ठिकाणी स्थलांतरित झालेल्या सुमारे १०० झाेपडपट्टीधारकांना घरकुल बांधण्यासाठी मंजूर जागेत तात्पुरते झाेपडे उभारण्याची परवानगी देण्यात अाली हाेती. यासह ज्यांना घरकुल मंजूर नाही, अशा २५ ते ३० जणांनीही त्याच ठिकाणी अतिक्रमण केले अाहे. मात्र, घरकुलांचा दुसरा टप्पा सुरू करण्यासाठी ती जागा माेकळी करणे गरजेचे असल्याने पालिकेला अाता माेहीम राबवावी लागत अाहे.