आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Encroachment And Hawkes News In Marathi, Divya Marathi

हॉकर्सना जागेसाठी मासिक फी आकारणी विचाराधीन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- अतिक्रमित म्हणून वागणूक मिळत असलेल्या हॉकर्सना मासिक किंवा वार्षिक भाडे आकारून जागा देण्यासंदर्भात धोरण निश्चित करण्याचे प्रशासनाच्या विचाराधीन आहे. विक्रेत्यांना हक्काच्या जागा उपलब्ध करून देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या पहिल्याच सभेत शहरातील कमी वर्दळीच्या जागा निश्चित करण्यासाठी सर्वेक्षण करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

आयुक्त संजय कापडणीस यांच्या दालनात झालेल्या बैठकीस उपायुक्त प्रदीप जगताप, वाहतूक पोलिस निरीक्षक रामकृष्ण भोसले, आरोग्य अधिकारी विकास पाटील, फेरीवाला संघटनेचे प्रतिनिधी नंदू पाटील, फारुक अहेलकार, सुनील सोनार, मोहन तिवारी, वासंती दिघे, अँड.हेमंत मुदलीयार, नीलिमा रेदासनी, डॉ. सीमा पाटील यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. आयुक्त ांनी सांगितले की, स्थानिक रहिवाशांना त्रास न होता, रहदारीला अडथळा निर्माण न होऊ देता शहरातील कमी वर्दळीच्या रस्त्यांवर हॉकर्सना जागा देण्यासंदर्भात सर्वेक्षण करण्यात येईल. फेरीवाल्यांचेही सर्वेक्षण करून त्यांना ओळखपत्र देण्यात येईल. मासिक किंवा वार्षिक ठरावीक फी आकारणी करून त्यांना जागा उपलब्ध करून देण्याचे धोरण ठरविण्यात येईल. पर्यायी जागांची माहिती संकलित करण्यासाठी नगररचना, शहरातील आर्किटेक्ट यांची मदत घेण्यात येईल. दोन आठवड्यांनंतर पुन्हा या समितीची बैठक घेण्यात येणार आहे.