आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Encroachment Eradication Division,latest News In Divya Marathi

बसस्टॅण्डसमोरील अतिक्रमणे हटवली; वाहतूक सुरळीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- बसस्थानकाला हातगाड्या, दुकानांनी वेढले होते. त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत होती. शुक्रवारी दुकानदारांचे अतिक्रमण पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने काढल्याने वाहतुकीची कोंडी दूर झाली. बसस्थानक आवारातील अतिक्रमित 13 विक्रेत्यांवर कारवाई करत हा परिसर मोकळा केला. दरम्यान, यापुढे तेथे अतिक्रमण होणार नाही याची खबरदारी पोलिस आणि राज्य परिवहन मंडळाच्या आगार प्रशासनाला घ्यावी लागणार आहे. यासंदर्भात महापालिकेतर्फे दोन्ही विभागांना पत्रव्यवहार करण्यात येणार आहे.
बसस्थानकाच्या आवारात विविध विक्रेत्यांनी अतिक्रमणे केली होती. समोरच असलेल्या पोलिस अधीक्षक कार्यालयासाठी ही मोठी डोकेदुखी ठरत होती. यासंदर्भात पोलिस विभागाने तक्रार अर्ज दिल्याने पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने शुक्रवारी या भागातील विक्रेत्यांची अतिक्रमणे काढली. भजे गल्लीत रस्त्यातच वस्तूविक्री करणाऱ्यांना रस्त्याच्या कडेला बसवण्याबाबत सांगण्यात आले. दरम्यान, बसस्थानकाच्या 100 मीटर परिसरात अतिक्रमण होऊ देण्याची जबाबदारी महामंडळाची आहे. त्यामुळे पालिकेतर्फे आगार व्यवस्थापक आणि पोलिस अधीक्षकांना पत्र देण्यात येणार आहे.
बसस्थानकासमोरील अतिक्रमण काढताना पालिकेचे कर्मचारी.
अनधिकृत बांधकामांवरही हातोडा
महापालिकेच्या नगररचना विभागातर्फे थकबाकीदारांकडून कागदपत्रांची मागणी केली जात आहे. या संदर्भात प्राप्त झालेल्या कागदपत्रांचा अभ्यास करुन विनापरवानगी बांधकाम झाल्याचे निदर्शनास आल्यास ते अनधिकृत म्हणून तोडण्यात येणार आहे. दिवाळी आटोपल्यावर ही मोहीम हाती घेतली जाऊ शकते. त्यामुळे वाहतुकीची समस्या सुटण्यास मदत होईल.