आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमण मोहिमेसाठी पथके, हप्तेखाेरीवरून प्रशासन टार्गेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शहरातील रस्त्यांवर दरराेज हातगाड्या वाढताहेत; परंतु त्या तुलनेत किरकाेळ वसुली मात्र तेवढीच अाहे. अनधिकृत विक्रेत्यांकडून वसूल रक्कम थेट कर्मचाऱ्यांच्या खिशात जात असल्याचा खळबळजनक अाराेप करण्यात अाला. मनसेच्या वतीनेही लक्षवेधी मांडत अतिक्रमण विभागातील कारभाराचा भंडाफाेड केला. अायुक्तांनी संतप्त भावना लक्षात घेता अतिक्रमणासंदर्भात चार पथके तयार करून कारवाई करण्याची घाेषणा केली.
महापाैर राखी साेनवणे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सकाळी ११ वाजता महासभा तर दुपारी १२ वाजेनंतर नियमित झाली. तसेच नपाला १५१ पूर्ण झाल्याने या वेळी केक कापण्यात आला. संस्थापक सदस्य भाना पाटील यांचे वारस नगरसेवक रवींद्र पाटील यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान सभेत मुख्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. एस.जे.पांडे यांच्याविषयी नाराजी व्यक्त करत ते नगरसेवकांशीही व्यवस्थित बाेलत नसल्याचा अाराेप केला. अायुक्त संजय कापडणीस यांनी डाॅ. पांडे यांच्याकडील पदभार काढून डाॅ. राम रावलानींकडे देत असल्याचे जाहीर केले. तर रमेश जैन यांनी अंध, अपंगांना घरकुले देण्याची मागणी लावून धरली.

भाजप गटनेत्यांचा संताप, मनसेची टाेलेबाजी : भाजपचेगटनेते डाॅ.अश्विन साेनवणेंनी अतिक्रमणाच्या विषयावर जाेरदार फटकेबाजी केली. तर मनसेचे अनंत जाेशी यांनी लक्षवेधी मांडत राष्ट्रीय फेरीवाला धाेरणाची अंमलबजावणी हाॅकर्स झाेनसह मागण्या केल्या.

अतिक्रमणकाढण्याचे अादेश समतानगरातीलपाइपलाइनवर झाेपडपट्टीचे अतिक्रमण हाेत असल्याचे सभापती नितीन बरडे सविता शिरसाठ यांनी सांगितले. पार्वताबाई भील यांनी हरिविठ्ठलनगर तर उज्ज्वला बेंडाळेंनी म्युनिसिपल काॅलनीतील मुद्दा मांडला. लढ्ढा यांनी मल्टी स्टाेरिंग पार्किंगचा निर्णय घेण्याचे अावाहन केले.

इतिवृत्तांतगाेंधळ कायम : मक्तेदारलहू रामा पर्वते यांचे नाव वगळण्याची सूचना डाॅ. साेनवणेंनी केली, तर भाजप नगरसेविका अॅड.शुचिता हाडा यांनी काेणाच्याही ताेंडून काहीही वाक्य टाकण्यावर अाक्षेप नाेंदवला.

मनपाला शुक्रवारी १५१ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल महासभेच्या वेळी महापौर राखी सोनवणे यांच्याहस्ते केक कापण्यात आला. या वेळी उपस्थित नितीन बरडे, संजय कापडणीस, रमेश जैन, नितीन लढ्ढा, नरेंद्र पाटील.

खड्डे बुजवण्याचे अादेश
शहरातपार्किंगची समस्या बिकट असल्याचे मान्य करत शहरातील नगरपालिका सानेगुरुजी रुग्णालयाच्या जागेचे खड्डे जमीन पातळीवर बुजवण्याचे अादेश दिले. त्याठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार अाहे. तसेच नाेंदणी नसलेल्या हाॅकर्सवर अतिक्रमण किरकाेळ वसुली विभागामार्फत कारवाईचे अादेश दिले. अतिक्रमणचे चार विभाग असायला हवेत. प्रभाग अधिकाऱ्यांना सक्षम करण्याची गरज व्यक्त केली. नवीन ट्रॅक्टर खरेदीनंतर चार ट्रॅक्टर प्रभागांना देऊन अतिक्रमणाचे चार पथके करण्याची घाेषणा केली.