आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुणा निश्चितीनंतरच, अतिक्रमणांवर कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मेहरूण तलाव परिसरातील ४४ आर क्षेत्रातील अतिक्रमण काढण्याचे आदेश देऊन आठवडा उलटल्यानंतर महापालिकेला लेखी आदेश प्राप्त झाले आहेत. त्यामुळे आता अतिक्रमीत जागेवर खुणा गाडून मार्किंग केल्यानंतर अंतिम कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेकडे फक्त पाच दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. मार्कींगसाठी पालिका भूमि अभिलेख कार्यालयाला पत्र देणार आहे.

मेहरूण तलावावरील अतिक्रमण केलेल्या क्षेत्रापैकी ४४ आर क्षेत्रातील अतिक्रमण काढण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी मंगळवारी काढले. यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ने नोव्हेंबर २०१४ मध्ये याविषयास वाचा फोडली होती. त्यानंतर तब्बल महिने अतिक्रमणाचे मोजमाप करण्यात आले. तलाव परिसरात प्रचंड अतिक्रमण असताना केवळ ४४ आर क्षेत्रात अतिक्रमण असल्याचा निष्कर्ष जिल्हा प्रशासनाने काढला असून कारवाई करण्यासाठी महापालिकेला लेखी कळवले आहे. तसा आदेशच महापालिकेला गेल्या आठवड्यात प्राप्त झाला आहे. मात्र दोन दिवसांच्या सलग सुटीमुळे यासंदर्भात प्रशासनातील अधिकाऱ्यांना याची माहितीच मिळु शकलेली नाही.

असे आहे अतिक्रमण
माजीआमदार मधू जैन यांच्या कुटुंबीयांसह रायसोनी कुटुंबीयांचेही अतिक्रमण याठिकाणी आहे. तसेच तलावाचा ट्रॅक हा देखील तलावाच्या जागेत आहे. सिटी सर्व्हे नंबर ४०८ ४०९ मधील प्लाॅट नंबर २० हे प्लाॅट देखील बाधीत असल्याचे नकाशात दाखवले आहे. सर्व्हे नंबर ४१३ मध्ये रस्ता अतिक्रमीत आहे. बड्या हस्तींचे अतिक्रमण असल्याने कारवाईसाठी काही दिवस लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भूमी अभिलेख विभागाला पत्र देणार
जमीनमहसूल अधिनियम १९६६ चे कलम ५० अन्वये शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतात. त्यांच्याकडील लेखी आदेश आल्यानंतर महापालिका अतिक्रमण काढण्यासाठी मदत करू शकते. परंतु त्यासाठी कोणत्या ठिकाणी किती अतिक्रमण आहे. याचे मार्किंग करणे गरजेचे ठरणार आहे. संबंधित जागांवर वापर सुरू असल्याने त्याठिकाणी खुणा गाडून ते स्पष्ट होणे गरजेचे आहे. यासाठी पालिका भूमी अभिलेख विभागाला पत्र देऊन मार्किंग करून देण्याची मागणी करणार आहेत.
दोन्हीनकाशांमध्ये दिसतेय तफावत
महापालिकेचेमोजणी शीट आताचे मोजणी शीट अर्थात नकाशे यांची सांगड बसत नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे दोन्ही नकाशांमध्ये बराच फरक आहे. तलावाची चारही बाजूने मोजणी झाल्याने पूर्वीच्या आताच्या नकाशांमध्ये काही अंशी फरक राहणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नाहक कोणाच्या आरोपांना तोंड देण्यापेक्षा संबंधित बाधीत जागांवर खुणा गाडण्यासंदर्भात भूमी