आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रमुख रस्ते होणार मोकळे, रहदारीची कोंडी होणाऱ्या रस्त्यांवरील अतिक्रमणांकडे लक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पालिका आणि पोलिस प्रशासनातर्फे शहरातील वाहतुकीची कोंंडी होत असलेल्या रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत टप्प्या-टप्प्याने संपूर्ण शहरातील रस्त्यांच्या दोन्ही बाजूला असलेल्या व्यावसायिकांच्या आेट्याचे तसेच पत्रीशेडचे अतिक्रमण काढण्याच्या हालचाली सुरू आहेत.

शहरातील प्रमुख रस्त्यांच्या दोन्ही बाजूकडील अतिक्रमित आेटे व्यावसायिकांनी केलेले शेड काढण्याची मोहीम पािलका प्रशासनाने हाती घेतली आहे. या मोहिमेनंतर रस्ते मोकळे होऊन वाहतुकीची कोंंडी कमी होणार असल्याने पोलिस विभागाकडूनही पालिकेला सहकार्य केले जात आहे. रेल्वेस्थानक परिसरातील अतिक्रमण काढल्यानंतर रविवारी दाणाबाजार घाणेकर चौक परिसरापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमित आेटे शेड काढले जाणार आहे. यासाठी शुक्रवारी आखणीचे काम झाले आहे. दाणाबाजारातील व्यावसायिकांनी स्वत:च पत्रीशेड आेटे काढून घेण्याची तयारी दर्शवली असल्याचे उपायुक्त प्रदीप जगताप यांनी स्पष्ट केले.

मो‍हिमेला विरोध नाही
अतिक्रमणमोहिमेला माझा विरोध नाही. कारवाई थांबवण्यासाठी कोंणत्याही अधिकाऱ्यांवर दबाव आणला नाही. ज्या व्यावसायिकांनी उन्हापासून पावसापासून बचाव करण्यासाठी ५० वर्षांपासून पत्रीशेड टाकले आहेत, ते आत्ताच कसे नडत आहेत. एखाद्याचा खून करणाऱ्यालाही न्यायालय त्याची बाजू मांडण्याची संधी देते. मग एवढी मोठी कारवाई करताना व्यावसायिकांना का विश्वासात घेतले जात नाही. अधिकारी नेमके कुणाचे एेकून ही कारवाई करत आहेत. सुरेशभाेळे, आमदार

स्वत:हून शेड, साहित्य काढून घेऊ
दाणाबाजारात एकमार्गी वाहतूक आहे. मात्र, त्यात पोलिस विभागातर्फे यावर लक्ष ठेवले जात नसल्याने वाहतुकीची कोंंडी होते. आधी या समस्या मार्गी लावण्याची मागणी वाहतूक पोलिस निरीक्षकांकडे केली आहे. यानंतरही रस्त्यात काही शेड साहित्य असल्यास ते आम्ही काढून घेण्याचे आवाहन व्यावसायिकांना केले आहे. प्रवीणपगारिया, अध्यक्षदाणाबाजार असोसिएशन