आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमणविरोधी मोहिमेत दुजाभाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - शहरात अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेत शुक्रवारी दुसऱ्या दिवशी पाेलिस बंदाेबस्त वाढवण्यात अाला हाेता. जामनेर राेडवरील अनेक अनधिकृत फलक पालिका कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले. गुरुवारपासून सुरू झालेल्या या मोहिमेत शुक्रवारी जामनेर रोडवरील अतिक्रमणे तोडण्यात आली. शुक्रवारी सकाळी ६.३० वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानाजवळून मोहिमेला सुरुवात करण्यात आली. गुरुवारपासून सुरू झालेली ही मोहीम शनिवारपर्यंत सुरू ठेवली जाणार आहे. दुसऱ्या दिवशी वसंत टाॅकीज परिसरातील पानटपऱ्यांचे अतिक्रमण काढण्यात अाले. तसेच व्यापारी संकुलाबाहेरील पायऱ्या ताेडण्यात अाल्या. मात्र, वसंत टॉकीज परिसरातील मद्यविक्री दुकानाच्या पायऱ्या अतिक्रमणविरोधी पथकाने तोडल्या नाहीत. त्यामुळे व्यावसायिकांनी पालिकेच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. पालिकेने हाती घेतलेल्या मोहिमेत दुकानांवर लावलेले फलकही काढण्यात आले. कारवाई पाहून काही दुकानदारांनी आपले अतिक्रमण स्वत:हून काढून घेतले.
वाहतूक झाली ठप्प : जामनेररोडवरील अतिक्रमण हटाव माेहिमेमुळे वाहतुकीची कोंडी झाली. रेल्वेच्या दगडी पुलाचे विस्तारीकरण सुरू असल्याने लाेखंडी पुलाखालील वाहतूक वाढली आहे. त्यात शुक्रवारी अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे रहदारीला अडथळा निर्माण झाला होता.
अतिक्रमण काढल्यानंतर संबंधित जागेवरील साहित्य पालिका कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून त्वरित जप्त केले.

एक दिवस वाढू शकताे
शनिवार पर्यंत शहरातील सर्व अतिक्रमणे काढण्याचे पालिकेचे उद्दिष्ट हाेते. मात्र, शनिवारपर्यंत अतिक्रमण काढण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यास, रविवारीदेखील अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जाऊ शकते, अशी माहिती मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

बंदाेबस्त असा
शुक्रवारी एक शिघ्र कृती दलाचे एक पथक पाच अतिरिक्त पाेलिस अधिकाऱ्यांची मोहिमेसाठी नियुक्ती करण्यात आली होती. डीवायएसपी राेहिदास पवार, मुक्ताईनगरचे डीवायएसपी अशाेक थाेरात, बाजारपेठचे पाेलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब केदारे, तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब गायधनी, पोलिस निरीक्षक वसंत माेरे, सहायक पाेलिस निरीक्षक एम.एन. मुळुक यांच्यासह अन्य अधिकारी २०० कर्मचारी असा ताफा बंदोबस्तासाठी तैनात हाेता. तसेच पालिकेचे नगर अभियंता विवेक भामरे, ए.बी. चाैधरी, सुभाष ठाकूर, संंजय बाणाईत आदी अधिकारी मोहिमेत सहभागी झाले.

चार जेसीबी लावले : शुक्रवारीचार जेसीबी मशीनद्वारे अतिक्रमणे हटवण्यात आली. त्यामुळे गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी मोहिमेला गती मिळाली. काही ठिकाणी खासगी जागांवरही पालिकेतर्फे जेसीबी चालवण्यात आले. या वेळी काही दुकानदारांनी जागेची कागदपत्रे दाखवली. मात्र, पालिकेच्या पथकातील अधिकाऱ्यांनी कागदपत्रे पाहण्यास नकार दिला.

चाेरट्यांचा धुमाकूळ : अतिक्रमणकाढताना झालेल्या गर्दीचा फायदा चाेरट्यांनी घेतला. दुकानातील साहित्य व्यावसायिक हटवत असताना चोरटे त्यावर डल्ला मारत होते. शुक्रवारी अशाच एका चोरट्याला शहर पाेलिस ठाण्याचे कर्मचारी प्रमाेद पाटील, कमलाकर बागुल यांनी पकडले. त्याच्याकडील साहित्य संबंधिताना परत करण्यात आले. तसेच पक्के बांधकाम तोडल्यानंतर लोखंडी सळया घेण्यासाठी भंगारवाल्यांची गर्दी झाली.

तीन पथके नियुक्त : शनिवारीअतिक्रमण काढण्याच्या मोहिमेसाठी तीन पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. वरणगाव रोड, जवाहर डेअरी आणि खडका रोड या तिन्ही ठिकाणी एकाचवेळी, सकाळी वाजेपासून कारवाई सुरू केली जाणार आहे. तीन जेसीबी मशीनद्वारे अतिक्रमण काढले जाईल.

पथक दररोज घेणार आढावा
^भविष्यात पुन्हा अतिक्रमण हाेऊ नये, यासाठी अतिक्रमण विराेधी पथक स्थापन केले जाणार अाहे. हे पथक दरराेज शहरात फिरून आढावा घेणार आहे. कारवाईपूर्वी बऱ्याच व्यावसायिकांनी अतिक्रमण स्वत: काढले ही बाब कौतुकास्पद आहे. सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न केला अाहे. अख्तर पिंजारी, नगराध्यक्ष,भुसावळ