आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेसीबीसमोर बसले भाविक; आमदार गोटेंंचा ठिय्या, स्वामिनारायण मंदिराची भिंत पाडली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - स्वामिनारायण मंदिराच्या प्रवेशद्वारासमाेर डीपी रस्ता माेकळा करण्यासाठी रस्त्यावरच ठिय्या देऊन बसलेले अामदार अनिल गाेटे त्यांनी अाणलेल्या जेसीबीसमाेर भजन गाणाऱ्या भाविकांचा नाट्यमय सामना बुधवारी सायंकाळी रंगला. जुने नकाशे पाहून रस्त्याची तपासणी केली. तरी भाविकांचा विराेध कायम असल्याचे पाहून नागरिकांचाही दबाव वाढायला लागला. अखेर भाविक भजने गात असतानाच मागील बाजूने गेलेल्या जेसीबीने मंदिराची मागील भिंत पाडली. चाळीस बाय पंधरा अाकाराची भिंत एकाएकी पडल्याचे दिसून येताच भाविकांसह पाेलिसांनी तिकडे धाव घेतली. तर अामदार गाेटेंनी काम फत्ते झाल्याचे सांगत परतीचा मार्ग धरला. रात्री उशिरापर्यंत भाविक मात्र प्रवेशद्वारासमाेर ठाण मांडून बसले हाेते. 
 
दत्त मंदिर परिसरातील डीपी रस्त्यावर स्वामिनारायण मंदिराने प्रवेशद्वार उभारून रस्ताच बंद केला अाहे. यावर आमदार अनिल गोटे यांच्याकडे नागरिकांनी तक्रारी केल्या. त्यानुसार बुधवारी आमदार अनिल गोटे यांनी सायंकाळी पाच वाजता स्वामिनारायण मंदिराचे अतिक्रमण काढण्यासाठी अावारात दाखल झाले. तेथे आनंदस्वामी, अॅड.जी.व्ही. गुजराथी यांच्याशी चर्चा केली. त्यात अॅड. जी.व्ही.गुजराथी यांनी मंदिराच्या आवारातून रस्ताच नसल्याचे सांगितले. मनपाने मंदिराच्या बांधकामाला रीतसर परवानगी दिली अाहे; परंतु आमदार अनिल गोटे यांनी जुने दाखले दाखवत हा रस्ता वापरात हाेता, हे सांगितले. त्यासाठी आमदार गोटे यांनी महापालिकेच्या नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंता प्रकाश सोनवणे आरेखक संजय बहाळकर यांना शहर विकास रचनेचे आराखडे घेऊन बोलावले. त्यात १९८६मधील शहर विकास आराखड्यात दत्त मंदिरकडून येणारा सरळ रस्ता दाखवला आहे. त्यानंतरच्या विकास आराखड्यातही रस्ताच दिसत असल्याचे गाेटे यांनी सिद्ध केले. यावर अॅड.जी.व्ही. गुजराथी यांनी हा प्रस्तावित नकाशातील रस्ता असून गावशिवाराच्या नकाशात हा रस्ता कोठे आहे ते दाखवा असा मुद्दा उपस्थित केला. यावर आमदारांनी विकासाच्या नकाशाच शहराचा असतो त्यात रस्ते आदीची सुविधा असते त्यातून शहरात रस्ते इतर बाबी केलेल्या असून, हाच मूळ नकाशा आहे, तोच तुम्हाला मान्य नाही. यानंतर शहरातील २२ वर्षांपासून हा प्रश्न रखडलेला आहे.
 
नागरिकांच्या सततच्या तक्रारी असल्याने तो काढावा असे म्हणत जेसीबी आत घेऊन कारवाई करा, असे सांगताच अॅड. गुजराथी सरळ जेसीबीसमाेर जाऊन उभे राहिले. माझ्या अंगावरून जेसीबी जाऊ द्या असे म्हणत तिथेच थांबले. तेथे आमदार गोटे त्यांची तावातावात चर्चा झाली. त्याच कालावधीत स्वामिनारायणच्या महिला भाविकही प्रवेशद्वारावरच बसून भजन म्हणायला लागल्या. तर आत विद्यार्थिनी बसून हाेत्या. सर्वजण प्रवेशद्वारावर असताना अचानकपणे एक जेसीबी मागील बाजूने जाऊन मागील बाजूच्या भिंतीचा काही भाग तोडण्यात आला. यानंतर आमदारांचे समर्थक नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर तेथून आमदार गोटे निघून गेेले. तर दुसरीकडे पोलिस पळत जाऊन जेसीबी कोणी आणला याचा शोध घेण्यासाठी गेले. 

महिला विद्यार्थ्यांचे भजन 
स्वामिनारायणमंदिराच्या आवारात आमदारांनी ठिय्या दिल्यानंतर स्वामिनारायणचे महिला भाविक तेथील विद्यार्थीही मोठ्या प्रमाणात जमले होते. त्यांनी मंदिराच्या आवारात बसून भजने म्हणण्यास सुरुवात केली.जवळपास दोन तास भजन सुरू होते. भिंत पाडल्यावर त्याजागीही बसून भजन सुरू होते. 

पोलिसांचा बंदाेबस्त 
पोलिसांचाया वेळी बंदोबस्त होता. या वेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी पोलिस उपअधीक्षक हिंमत जाधव पोलिस निरीक्षक रमेश परदेशी यांच्यासह पोलिस पथक उपस्थित होते. 

२० वर्षांनी मिळाला न्याय... 
^भिंतकुणी पाडली, याचे उत्तर अॅक्ट आॅफ गॉड असे आहे. रस्ता मोकळा झाला, यावर मात्र शिक्कामोर्तब झाले आहे. २० वर्षांपासून स्वामिनारायण मंदिर संस्थानने भर रस्त्यावर भिंत बांधून अितक्रमण केले. नागरिकांच्या तक्रारींना कधीच जुमानले नाही. प्रशासनाने कारवाई केली. तेव्हा वरिष्ठ स्तरावरून दबाव आणला गेला. आता मात्र नागरिकांसाठी हा रस्ता मोकळा करण्याचे काम मी केले. मागील बाजूची भिंत पाडली आहे. पुढील बाजूही आपोआप पडेल. -अनिलगोटे, आमदार 

भूसंपादनाची रक्कम देऊ 
^गावशिवारात मंदिरामधून रस्ता नाही. शहर विकास आराखड्यात प्रस्तावित रस्ता होता. त्यानंतर मनपा ठराव करून रस्ता बाजूने वळविला आहे. त्यासाठी मंदिराच्या जागेचे बाजूच्या रस्त्याच्या अधिग्रहणाची किंमत ठरवून त्या दोघांमधील जी रक्कम येईल ती देण्यास तयार आहे. त्यासाठी मनपा कामाचे लाइनआऊट द्यावे यासाठी मनपाला बऱ्याचदा पत्रे देण्यात आली आहे. मात्र, अद्यापही त्याबाबत कार्यवाही झालेली दिसत नाही. -जी.व्ही. गुजराथी, अॅडव्होकेट 
मंदिराच्या मागील बाजूची भिंत जेसीबीद्वारे पाडताना. 

 
बातम्या आणखी आहेत...