आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांना हॉकर्स अन् पोलिसांकडून मारहाण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महापालिकाविरुद्ध शहरातील हाॅकर्स हा संघर्ष अाणखी तीव्र हाेत चालला अाहे. सातत्याने हाेणाऱ्या वादानंतरही मनपा प्रशासन यावर ताेडगा काढत नसल्यामुळे साेमवारी सायंकाळी पुन्हा एकदा स्फोटक परिस्थिती निर्माण झाली हाेती. अतिक्रमण हटाव कारवाईसाठी गेलेल्या पालिकेच्या पथकाला हाॅकर्ससह पाेलिसांनी मारहाण करत पिटाळून लावल्याचा प्रकार घडला. विशेष म्हणजे अातापर्यंत चापटा बुक्क्यांपर्यंत मर्यादित असलेल्या वादात थेट काठ्या-लाठ्यांसह विळा सुरींचा वापर झाला. या अवघड दुखण्यावर वेळीच उपचार केले नाही, तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, असे चिन्हे सध्या दिसत अाहे.
मनपाकडून बळीरामपेठेसह सुभाष चाैकातील अतिक्रमणाविरुद्ध कडक धाेरण अवलंबण्यात अाले अाहे. गेल्या दाेन महिन्यांपासून रस्त्यावर व्यवसाय करण्यास बंदी घातल्याने पालिकेविरुद्ध हाॅकर्सने संघर्षाचा पावित्रा घेतला अाहे. हा वाद न्यायालयातही पाेहोचला असून त्यावर अद्याप अंतिम निर्णय लागलेला नाही. नेहमीप्रमाणे तक्रारींचे निरसन करत साेमवारी अतिक्रमण विभागाचे पथक मासूमवाडीतील अतिक्रमणधारकांना सूचना करून राजकमल टाॅकीजकडून सुभाष चाैकाकडे रस्त्यावरील हाॅकर्सला हटवत पुढे गेले. हाॅकर्स जगदीश भाेई त्यांच्या भावाचे साहित्य जप्त करण्याची कारवाई सुरू असताना प्रतिकार करण्यात अाला. हा वाद वाढत असताना अतिक्रमणाच्या पथकाने बळीरामपेठेत कारवाई सुरू केली. या वेळी अाेट्यावर झाकून ठेवलेला माल पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जप्त करण्याचा प्रयत्न केला अाणि वादाला ताेंड फुटले. कर्मचाऱ्यांनी जप्त केलेला माल परत देण्यावरून रंजनाबाई नावाच्या महिला हाॅकर्सने अाग्रही भूमिका घेतली. व्यवसाय करत नसताना माल जप्त करणे याेग्य नसल्याने अन्य हाॅकर्सनेही ताे माल परत करावा, यासाठी दबाव अाणला. परंतु, पालिकेचे कर्मचारी एेकत नसल्याने सुमारे ३०० ते ४००च्या जमावाने कर्मचाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केल्याचे अतिक्रमणच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

सुभाष चाैकात मनपा अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीमुळे पाेलिस अधीक्षक कार्यालयात डीवायएसपी सचिन सांगळे यांच्या दालनाबाहेर उभे असलेले मनपा कर्मचारी.

झटापटीदरम्यान पालिका कर्मचाऱ्यांनी हाॅकर्स महिलेला मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना कंबरेवरील बाळाला चापट लागल्याने त्याला तातडीने दवाखान्यात नेण्यात अाले. त्याचप्रमाणे गाेंधळ सुरू असताना रंजनाबाई राजू पाटील (वय ३८, रा.सुप्रीम काॅलनी) या महिला हॉकर्सला मनपा कर्मचारी सादीक, नासीर हरी साेनवणे यांनी अाेक मंगल कार्यालयाजवळ भाजीपाला हिसकावून मारहाण केली. त्यात त्यांच्या गळ्यातील पाेत तुटून नुकसान झाले. याप्रकरणी रंजनाबाई यांनी शनिपेठ पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.

झटापटीदरम्यान बालकाला मार
कर्मचाऱ्यांवर हप्तेखाेरीचा अाराेप

महापालिकेचे अतिक्रमण विभागातील कर्मचारी हे १०० रुपयांत व्यवसाय करण्याची परवानगी देतात. जे हाॅकर्स पैसे देत नाही, त्यांच्यावर कारवाई करतात. तसेच सायंकाळी जप्त केलेला माल साहित्य परत करण्यासाठी ५०० ते १००० रुपये घेतले जातात. हाॅकर्सकडून जप्त केलेले महागडा भाजीपाला परत करताना अत्यंत कमी असताे. त्यामुळे पालिकेत जमा हाेणारा माल जाताे कुठे? असा प्रश्न असाेसिएशनच्या अध्यक्ष शकुंतला पाटील, लताबाई माळी, मंगलाबाई चाैधरी, बंडू साेनार यांनी केला अाहे.

पाेलिसांनी दिली हाॅकर्सना साथ
दिवसांपूर्वीशनिपेठ पाेलिसांनी बळीरामपेठेतील हाॅकर्सवर कारवाई करण्याबाबत पालिकेला पत्र दिले हाेते. त्यानुसार कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकातील कर्मचारी नसिराेद्दीन भिस्ती माया गाेयर तसेच अाधार काेळी यांना हाॅकर्सने मारहाण केली. या वेळी हाॅकर्सला अावरण्याचा प्रयत्न करता शनिपेठ पाेलिसांनीदेखील हाॅकर्ससाेबत महापालिका कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

हत्यारांच्या वापराने खळबळ
हाॅकर्सने घेरल्यानंतर काही हाॅकर्सने थेट त्यांच्याजवळील विळा काेयते हातात घेत कर्मचाऱ्यांना मारण्याचा प्रयत्न केल्याचा अाराेप कर्मचारी भिस्ती, गाेयर यांनी केला अाहे. त्यामुळे बळीरामपेठ सुभाष चाैकातील अतिक्रमणाचा प्रश्न चांगलाच तापल्याचे या घटनेवरून दिसून येते.
महापालिका कर्मचाऱ्यांची पाेलिस अधीक्षकांकडे धाव
हाॅकर्ससाेबत पाेलिसांनीही मनपा कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याने संतप्त झालेल्या अतिक्रमणच्या सर्व कर्मचाऱ्यांनी थेट पाेलिस अधीक्षकांकडे धाव घेतली. या वेळी उपविभागीय पाेलिस अधिकारी सचिन सांगळे यांची अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यात पाेलिस अधिकारी कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना मदत करण्याएेवजी मारहाण केल्याची तक्रार केली. त्यावर सांगळे यांनी चाैकशी करण्याचे अाश्वासन दिले.

दाेषींवर कारवाई करण्यात येईल
^हाॅकर्स मनपाकर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला अाहे. मनपाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन तक्रार केली. याप्रकरणी पाेलिस मनपाची बाजू एेकून त्यानंतर दाेषींवर कारवाई केली जाईल. सचिन सांगळे, उपविभागीय पाेलिस अधिकारी
बातम्या आणखी आहेत...