आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरपालिकेला ‘अतिक्रमण हटाव’ कारवाईसाठी अखेर मुहूर्त गवसला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - पालिकेने अतिक्रमण निर्मूलनाचा ठराव केल्यानंतर सहा महिने उलटूनही प्रत्यक्ष कारवाईसाठी मुहूर्त सापडत नव्हता. मात्र, आता पालिकेने अतिक्रमणावर हातोडा उगारला असून २८ ते ३० जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस शहरातील प्रमुख मार्गांवरील अतिक्रमण काढले जाणार अाहे. त्यासाठी १०० पोलिस, १२० पालिका कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात केला अाहे, अशी माहिती नगराध्यक्ष अख्तर पिंजारी मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
पालिका जलशुद्धीकरण केंद्रात ही पत्रकार परिषद झाली. त्यात नगराध्यक्ष पिंजारी म्हणाले की, गल्लीबोळांत जागा मिळेल तेथे टपरी टाकून अतिक्रमण करण्याचे प्रमाण वाढले आहे. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी पालिका प्रशासनाकडून सहा महिन्यांपूर्वी अतिक्रमण काढण्यासाठी ठराव करण्यात आला होता, यानंतर नियोजनही पूर्ण झाले होते. मात्र, त्यादरम्यान तत्कालीन मुख्याधिकारी भारत राठोड यांनी कौटुंबिक कारणामुळे नियोजित तारखेलाच सुटी घेतल्याने हे काम ठप्प झाले. मात्र, आता मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर यांनी पदभार घेतल्यानंतर मोहिमेला पुन्हा गती मिळाली आहे. पालिकेने २८ जानेवारीपासून तीन दिवस यावल, वरणगाव, जामनेर, जळगाव, खडका राेडसह सराफ बाजार, मॉडर्न रोड भागातील अतिक्रमण काढण्याचे नियोजन केले आहे. २८ जानेवारी राेजी सकाळी वाजेपासून यावल राेडवरील महात्मा गांधी पुतळ्यापासून अतिक्रमण हटाव कारवाई सुरू हाेईल. रस्त्यावरील टपऱ्या, पक्के - अर्धेपक्के बांधकाम, गटारींवर आलेल्या पायऱ्या, ढापे आदी तोडून जागा पूर्ववत केली जाणार आहे. अतिक्रमणधारकांना जाहीर नोटिसीद्वारे कळवण्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले. बांधकाम विभागाचे अभियंता विवेक भामरे आदी उपस्थित होते.

असे अाहे नियोजन
सेक्टर अाॅफिसरनियुक्त करणार : अतिक्रमणहोऊ नये, यासाठी अाता आरोग्य निरीक्षकांची सेक्टर ऑफिसर म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. त्यांना प्रत्येक भाग विभागून दिला जाईल. अतिक्रमण झाल्यास ते १२ तासांच्या आत नष्ट केले जाईल. अतिक्रमण कायम राहिल्यास ही जबाबदारी संबंधित सेक्टर अधिकाऱ्याची राहील. शहरात पालिकेतर्फे बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या शेजारी छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारणीचे काम प्रगतिपथावर होते. मात्र, यासाठी पोलिसांनी संबंधित विभागाला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पाहता नकार कळवला आहे. म्हणून पुतळ्याच्या कामाला परवानगी मिळाली नाही, अशी माहितीही नगराध्यक्ष अख्तर पिंजारी यांनी या पत्रकार परिषदेत अावर्जून दिली.
Áनगरोत्थान निधीभरला : पालिकेलानगरोत्थान योजनेतून कोटी ९८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. यात निम्मे रक्कम अर्थात कोटी ९९ लाख रुपये भरल्याशिवाय तो वापरता येणार नव्हता. यामुळे पालिकेने ही ५० टक्के रक्कम भरली असून, आता कोटी ९८ लाख रुपयांचा निधी वापरून भीलवाडी परिसर, मामाजी टॉकीज रोड, सिंधी कॉलनीतील प्रमुख रस्ता, स्वामी विवेकानंद शाळेजवळील रिंगरोड परिसरातील वर्दळीचा रस्ता आणि वांजोळा रोडचे डांबरीकरण अाणि मजबुतीकरणाचे काम करण्यात येणार आहे.
नाट्यगृहा साठी निधीमंजूर : शहरातबंदिस्त नाट्यगृह उभारण्याची मागणी हाेती. या कामासाठी शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून कोटी ९४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तालुका पोलिस ठाण्याजवळ पालिकेने आरक्षित केलेल्या सर्व्हे क्रमांक ८६मध्ये या भव्य वास्तूची उभारणी होईल. यासाठी लवकरच प्रशासकीय मंजुरी मिळणार आहे. तसेच आगामी काळात पालिका फंडातून या नाट्यगृहासाठी अत्याधुनिक साऊंड सिस्टिम, लाइटिंग, संपूर्ण वातानुकूलित यंत्रणा उभारणीचे प्रयत्न अाहेत.