आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे शहरातील आग्रा रस्ता फेरीवालामुक्त, वाहतूक सुरळीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - शहरातील आग्रा रस्त्यावर दोन्ही बाजूला फेरीवाले व्यावसायिकांमुळे होणार्‍या वाहतूक कोेेंडीचे दृश्य नेहमीचेच झाले होते. परंतु, गुरुवारी सकाळी आग्रा रस्त्यावर वेगळेच चित्र पाहावयास मिळाले. पाच कंदील ते गांधी चौकापर्यंतचा पूर्ण रस्ता फेरीवालामुक्त होता. सकाळी सहा वाजेपासून महापालिकेने पोलिसांच्या साह्याने पाच कंदील ते गांधी चौकापर्यंतच्या रस्त्यावर अचानक बंदोबस्त लावून एकही फेरीवाला व्यावसायिकास तेथे प्रवेश करू दिला नाही. त्यामुळे प्रथमच हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा िदसत होता.

शहरातील आग्रा रस्ता हा मुख्य बाजारपेठेचा भाग आहे. या रस्त्यावर सर्व प्रकारची दुकाने आहेत. तसेच पाच कंदील चौकातही मुख्य व्यापारी गाळे घाऊक व्यापार्‍यांची दुकाने आहेत. त्यामुळे गांधी चौकापासून ते पाच कंदील चौकापर्यंत खरेदीसाठी नागरिकांची दररोज गर्दी होते. त्याचप्रमाणे या रस्त्याच्या दोन्ही बाजूला हातगाड्यांवर व्यवसाय करणारे रस्त्याच्या कडेला बसून व्यवसाय करणार्‍यांची संख्याही माेठी होती. पाच कंदील चौकावर तर पूर्णपणे फेरीवाले व्यावसायिकांचाच ताबा होता. त्यामुळे या चौकातून वाहन नेणे अशक्य झाले होते. परिणामी, दरराेज वाहतूक काेंडी हाेऊन त्याचा त्रास वाहनधारकांना आणि नागरिकांना होत होता.

या विषयावर एक-दोन वेळा बैठकही झाली आहे. अखेर महापालिका आयुक्तांनी गुरुवारी सकाळपासून आग्रा रस्त्यावर एकाही फेरीवाले व्यावसायिकास प्रवेश द्यायचा नाही, असे आदेश दिले. त्यानुसार पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने सकाळी सहा वाजता पोलिस महापालिका कर्मचार्‍यांनी गांधी चौकापासून ते पाच कंदीलदरम्यानच्या रस्त्यावरील चौकाचौकात बॅरिकेड्स लावून आणि तेथेच थांबून फेरीवाले व्यावसायिकांना प्रवेश िदला नाही. त्यामुळे आग्रा रस्त्यावर फेरीवाल्यांना प्रवेश िमळू शकल्याने दुसरीकडे जावे लागले. रस्त्यावर कर्मचारी दिवसभर थांबल्याने आग्रा रस्ता फेरीवालामुक्त झाला. नेहमीची गर्दी, गाेंगाट, कोंंडी असे काहीही घडल्याने वाहनांना मोकळेपणाने ये-जा करता आली. त्यामुळे गुरुवारी आग्रा रस्ता खर्‍या अर्थाने ‘नो हाॅकर्स झोन’ ठरला.

१७ पॉइंटवर लावला बंदोबस्त...
पाचकंदील ते गांधी चौकापर्यंतच्या रस्त्यावरील प्रत्येक चौकात दोन्ही बाजूला मनपा पोलिस कर्मचारी संयुक्तपणे बंदोबस्तावर आहेत. यादरम्यान १७ पॉइंट असून, तेथे बॅरिकेड‌्स लावण्यात आले आहेत.

३० कर्मचारी दोन शिफ्टमध्ये
आग्रा रस्त्यावर सर्व ठिकाणी मनपाचे कर्मचारी पोलिसांची १७ पॉइंटवर िनयुक्ती करण्यात आली आहे. मनपाचे ३० कर्मचारी १५ पोलिस दोन शिफ्टमध्ये तेथे थांबून लक्ष ठेवणार आहेत. सकाळी ते दुपारी दुपारी ते रात्री वाजेपर्यंत हे कर्मचारी थांबणार आहेत.

अधिकारी उतरले रस्त्यावर...
सकाळीसहा वाजता पाच कंदील चौकात आयुक्त डॉ.नामदेव भोसले, उपायुक्त डॉ.प्रदीप पठारे, त्र्यंबक कांबळे, नगररचना विभागाचे अभियंता सुरेश विसपुते, अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिकारी बी.बी.गिते, नंदकुमार बैसाणे, रत्नाकर माळी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक एम.बी.पाटील आदी उपस्थित होते. या वेळी संपूर्ण रस्त्यावर पोलिस बंदोबस्त होता. तसेच चैनी रस्त्यावरील अतिक्रमणेदेखील काढण्यात येत आहेत.

४०० फेरीवाले व्यावसायिक...
आग्रारस्ता हा प्रमुख मार्ग आहे. नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होत असल्याने तेथे फेरीवाले व्यावसायिकांची गर्दी वाढत गेली. सध्या पाच कंदील ते गांधी चौकादरम्यान साधारणपणे ४०० फेरीवाले व्यावसायिक व्यवसाय करतात. त्यात नोंद झालेल्या नोंदणी केलेल्या व्यावसायिकांचा समावेश आहे.
बातम्या आणखी आहेत...