आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमणावर हाताेडा, ‘दिव्य मराठी’ने लक्ष वेधल्याने कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - रेल्वेस्थानक ते जिल्हा परिषद रस्त्यालगत हाॅटेल बाॅम्बेलगत गटार बांधकामासाठी अडथळा ठरत असलेल्या अतिक्रमणावर पालिकेचा हाताेडा पडला. अतिक्रमणधारकांना संरक्षण देत गटारीचे बांधकाम बिनधास्तपणे सुरू असल्याकडे ‘दिव्य मराठी’ने लक्ष वेधले हाेते. दरम्यान ही कारवाई राजकीय सुडबुद्धीने झाली असून गरिबांसाठी एक तर बड्यांसाठी दुसरा नियम लावला जात असल्याचा आराेप अतिक्रमणधारकांनी केला आहे.

पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकातर्फे गुरुवारी सकाळी १० वाजता रेल्वेस्थानक परिसरात कारवाईला सुरुवात झाली. या करावाईत गटारीला अडथळा ठरत असलेल्या दाेन पानटपर्‍या आणि हाॅटेल बाॅम्बेच्या व्यवस्थापनाने गटारीवर ठेवलेले जनरेटर, वातानुकूलीत यंत्र काढण्यास सुरुवात करण्यात आली. अतिक्रमण अधीक्षक इस्माईल शेख, कनिष्ठ अभियंता जितेंद्र रंधे, अतिक्रमण निर्मूलन पथकातील रवी कदम, साजीद अली, शिरीष काळे यांच्यासह इतर कर्मचार्‍यांनी सुमारे दाेन तासात जेसीबी आणि हाताेड्याच्या साहाय्याने अतिक्रमण काढून टाकले. दरम्यान पूर्व कल्पना देता ही कारवाई करण्यात आल्याचा आराेप बाधितांनी केला आहे.

काय आहे प्रकरण
रेल्वेस्थानक ते जिल्हा परिषद रस्त्यावरील सांडपाण्याचा निचरा हाेण्यासाठी हाॅटेल बाॅम्बेलगत नवीन आरसीसी गटार बांधकामाला पालिकेने मंजुरी दिली हाेती. पालिकेतर्फे गटार बांधकामासाठी आखणी करून दिलेल्या जागेत आेट्यांसह काही पानटपर्‍यांचे अतिक्रमण हाेते. मात्र, मक्तेदाराने काम उरकण्यासाठी प्रशासनाची पूर्वपरवानगी घेता, आहे त्या स्थितीत गटार बांधकाम सुरू केले हाेते. मक्तेदाराच्या कृतीमुळे बांधकाम पूर्ण झाल्यास अतिक्रमणांना कायमस्वरुपी अभय दिले जाणार असल्याची आेरड हाेत हाेती.

कारवाई नियमानुसारच
रस्त्यावरील कोणतेही पक्के अतिक्रमण काढण्यासाठी संबंधितास नाेटीस बजावण्याची कायद्यात कोणतीही तरतूद गरजेचे नाही. त्यामुळे या कारवाई संदर्भात काेणी काहीही आराेप केला तरी त्यात तथ्य नाही. पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकातर्फे गुरूवारी करण्यात आलेली कारवाई नियमानुसारच करण्यात आली आहे. इस्माईल शेख, अतिक्रमण निर्मूलन विभाग प्रमुख

नाेटीस न देता कारवाई
अतिक्रमण काढण्यापूर्वी पालिकेने काेणतीही नाेटीस दिली नाही. बुधवारी सायंकाळी ताेंडी सूचना देऊन गुरुवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. गटारीसाठी या रांगेतील टपर्‍या काढण्यासाठी संधी दिली नाही. बड्यांचे अतिक्रमण काढण्यास मात्र सवलत देण्यात आली आहे. या कारवाईमागे राजकारण असल्याचा संशय येताे. रवींद्र पाटील, भाई-भाईपान सेंटर चालक

केवळ ताेंडी सूचना दिल्या
पालिकेच्या अतिक्रमण विभागाने आम्हाला काेणत्याही लेखी सूचना देता सरळ कारवाई केली. झालेली कारवाई अन्यायकारक आहे. पानटपरीवर आमच्या संपूर्ण कुटूंबाचा उदरनिर्वाह आहे. पालिकेने नाेटीस बजावणे, स्वत:हून अतिक्रमण काढून घेण्यासाठी आम्हाला संधी द्यायला हवी हाेती. त्यामुळे आमचे नुकसान टळले असते. - शिवाजी पाटील, चालक,बाॅम्बे पान सेंटर

इतरही भरपूर अतिक्रमणे
कारवाई करण्यापूर्वी संबंधितांना नाेटीस द्यायला हवी हाेती. थेट कारवाई करायला नकाे हाेती. शहरात इतरही भरपूर अतिक्रमणे आहेत. पालिका प्रशासन त्यांच्यावर कारवाई करत नाही. ही कारवाई राजकीय वाटते. सुरेश भाेळे, आमदार
राजकारण नाही
रेल्वेस्थानक परिसरात अतिक्रमणांमुळे रहदारीची काेंडी हाेते. त्यामुळे अतिक्रमणे काढण्यासाठी मीच पाठपुरावा केला हाेता. यात काेणतेही राजकारण नाही. आमदारांनी अशा छाेट्या गाेष्टींकडे लक्ष द्यायला नकाे. सुनील महाजन,
बातम्या आणखी आहेत...