आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

६५ हजार चौरस फुटांवर गाळेधारकांचे अतिक्रमण!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- पालिकेच्यामुदत संपलेल्या गाळ्यांना नव्याने करार करून देण्यापूर्वी त्यांचे मोजमाप करण्यात आले आहे. त्यानुसार आतापर्यंत झालेल्या मोजमापात गाळेधारकांनी मूळ बांधकामाव्यतिरिक्त ६५ हजार चौरस फुटांचे अतिरिक्त अतिक्रमण केल्याची बाब समारे आली आहेत. गांधी मार्केटसह फुले सेंट्रल फुले मार्केटमधील बहुतांश व्यापा-यांनी दुकानाच्या मूळ रचनेत बदल करत पूर्ण माळोचा बांधून चटई क्षेत्र वाढवले आहे.
पालिकेच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील अडीच हजार गाळ्यांच्या सर्वेक्षणाचे काम प्रशासनाने हाती घेतले होते. फुले सेंट्रल फुलेसह सर्वच मार्केटमधील गाळ्यांच्या सर्वेक्षणाचे काम पूर्णत्वाकडे आले असून, सर्वेक्षणानंतर हाती आलेल्या आकडेवारीने प्रशासनही थक्क झाले आहे. थोडेथोडके नव्हे, तर मार्केटच्या मूळ बांधकामरचनेत फेरबदल करून गाळेधारकांनी सुमारे हजार चौरसमीटर (६४ हजार ५६० चौरस फूट) अतिरिक्त चटई क्षेत्र वाढवून अतिक्रमण केले आहे. तसेच तळमजल्यावरील बहुतांश गाळेधारकांनी जमिनीत खोदकाम करून दुकानांची उंची वाढवली आहे. या प्रकारामुळे बांधकामाच्या मूळ रचनेशी छेडछाड झाली असून, मार्केटच्या आयुष्यावरही त्याचा परिणाम होऊ शकते. त्यामुळे काही गाळेधारकांशी केलेले खोदकाम बुजवल्यानंतरच सुधारित करार करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.