आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2500 घरांमधील अतिक्रमण काढणार, मंगळवारी मोहीम; रहिवाशांनी नोटीस फाडून फेकल्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण काढून जीर्ण घरे जमीनदोस्त करण्याची मोहीम रेल्वे प्रशासन १२ डिसेंबरपासून हाती घेणार आहे. तत्पूर्वी, गुरुवारपासून २५०० अतिक्रमितांच्या घरांना नोटीस डकवण्याचे काम सुरू झाले. यामुळे रेल्वेच्या जागेवर अनधिकृत रहिवास करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

 

रेल्वे बोर्डाकडून प्राप्त झालेल्या सुचनांची अंमलबजावणी करत रेल्वेच्या मालकीच्या जागा, इमारतींमधील अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू आहे. यापूर्वी काही ठिकाणी कारवाई झाली. मात्र, तीन टप्प्यातील खऱ्या मोहिमेस १२ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्यात १२ ते १४ डिसेंबरदरम्यान अागवाली चाळीतील अतिक्रमणावर हाताेडा पडणार आहे. यानंतर हद्दिवाली चाळ १९ ते २१ डिसेंबर चांदमारी चाळीतील अतिक्रमण २६ ते २८ डिसेंबरदरम्यान निघेल. यासाठी डीअारएम अार.के.यादव यांनी अधिकारी सुरक्षा यंत्रणेची बैठक घेतली. नियमानुसार अतिक्रमण काढण्याची सूचना केली. दरम्यान, अतिक्रमण काढल्यानंतर रिकाम्या झालेल्या जागांचा एखाद्या रेल्वे प्रकल्पासाठी वापर होण्याची शक्यता सुत्रांनी वर्तवली.

 

नोटीस फाडून फेकल्या
मंडळअभियंता एम.एस.ताेमर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरूवारी २५ कर्मचाऱ्यांच्या पथकाने अागवाली चाळ, हद्दीवाली चाळ चांदमारी चाळ या भागातील अतिक्रमित घरांवर नाेटीस चिकटवण्यास सुरुवात केली. त्यात तीन टप्प्यातील नियोजित अतिक्रमण हटाव मोहिमेची माहिती आहे. तसेच कारवाईपूर्वीच रेल्वेची जागा सोडावी, असे आवाहन करण्यात आले आहे. काही रहिवाशांनी या नोटीस फाडून फेकल्या.

 

बातम्या आणखी आहेत...