आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभियांत्रिकी: 3773 जागा अद्यापही रिक्त, यंदा अनेक महाविद्यालयांची अवस्था बिकट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- यंदा संपूर्ण राज्यात अभियांत्रिकीच्या जागा मोठय़ा प्रमाणात रिक्त राहिल्या आहेत. खान्देशातही तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील 17 अभियांत्रिकी महाविद्यालयात एकूण 6805 जागांपैकी 3773 जागा रिक्त राहिल्या आहेत. तर 3032 जागांवर प्रवेश देण्यात आले आहेत.

उच्च व तंत्रशिक्षण मंडळातर्फे गेल्या महिनाभरापासून अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली. प्रवेश प्रक्रियेचे तीन राउंड आता संपले आहेत. तीनही राउंड अखेर खान्देशातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये 50 टक्केपेक्षा जास्त जागा रिक्त राहिल्या आहेत. शहरातील शासकीय अभियांत्रिकी, एसएसबीटी बांभोरी, शिरपूर येथील आरसी पटेल आणि धुळे येथील एसएसव्हीपीएस अभियांत्रिकी महाविद्यालयात सर्वात जास्त जागांवर प्रवेश दिले गेले आहेत. तर काही महाविद्यालयांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.

10 पर्यंत अखेरची संधी
ज्या महाविद्यालयात जागा रिक्त आहेत, अशा महाविद्यालयांना 10 ऑगस्टपर्यंत इन्स्टिट्यूट लेव्हलवर प्रवेश देणे सुरू आहे. यादरम्यान बोटावर मोजण्याइतके प्रवेश होतील, असा अंदाज आहे. त्यामुळे आता काही अभियांत्रिकी महाविद्यालय पूर्णपणे अडचणीत सापडले आहेत. गेल्या वर्षापेक्षा यंदाची अवस्था जास्त खराब आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात तिसरी प्रवेश फेरी संपल्यानंतर तीन विद्यार्थ्यांनी निश्चित झालेले प्रवेश रद्द केले आहे. या तीन रिक्त जागांसाठी गुरुवारी प्रवेश प्रक्रिया होणार आहे. तर इतर महाविद्यालयांमध्ये 10 ऑगस्टपर्यंत प्रवेश दिले जातील.

सिव्हिलच्या मागणीत मोठय़ा प्रमाणात वाढ
सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी यंदा जास्त मुलांनी पसंती दाखवली आहे. एकेकाळी या शाखेकडे विद्यार्थी फिरकत नव्हते. मात्र यंदा सिव्हिल इंजिनिअरिंगकडेही कल वाढला आहे. यासह संगणक, ऑटोमोबाइल, ई अँण्ड टीसी या शाखेकडेही विद्यार्थ्यांचा कल राहिला आहे.

प्राध्यापक अतिरिक्त ठरण्याची भीती
अभियांत्रिकी महाविद्यालयात जागा रिक्त राहिल्यास काही महाविद्यालयांवर अभ्यासक्रम बंद करण्याची वेळ येऊ शकते. तसे झाल्यास प्राध्यापक अतिरिक्त ठरण्याची भीती आहे. त्यामुळेही व्यवस्थापनाला रिक्त जागा भरण्यासाठी कसरत करावी लागेल.