आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Engineering Admission Test Issue At Jalgaon, Divya Marathi

अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी प्रवेश पात्रता पाच गुणांनी वाढली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेण्याकरिता राखीव गटासाठी 45 टक्के तर खुल्या गटातील विद्यार्थ्यांनी 50 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. यापूर्वी राखीव आणि खुल्या गटासाठी अनुक्रमे 40 आणि 45 टक्क्यांचा नियम होता. विशेष म्हणजे यंदा जेईई मेन्सचे पर्सेंटाइल आणि बारावीतील गुणांच्या आधारे हा प्रवेश देण्यात येणार आहे.

आजवर अभियांत्रिकी शाखेत प्रवेशपूर्व परीक्षेतील गुणांच्या आधारावर प्रवेश दिला जात होता. परंतु देशभरात अभियांत्रिकी प्रवेशासाठी जेईई मेन्स परीक्षा लागू करण्यात आली. त्यामुळे ‘जेईई’मध्ये मिळालेले पर्सेंटाइल आणि बारावीतील भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र या विषयातील एकत्रित गुण मिळून विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. जेईई आणि बारावीचे गुण मिळून ज्या राखीव गटातील विद्यार्थ्यांना 45 आणि खुल्या गटातील विद्यार्थ्यांना 50 टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळतील ते विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र असणार नाहीत, अशा नव्या सूचना देण्यात आल्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागातील विशेष कार्यकारी अधिकारी एस. एस. रगटे यांनी दिली. बारावीच्या निकालानंतर ‘जेईई’ची समिती बारावीचे गुण ‘जेईई’तील पर्सेंटाइलनुसार गुणवत्ता यादी तयार करेल.