आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Engineering Entrance Issue At Jalgaon, Divya Marathi

अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेमध्‍ये विद्यार्थ्‍यांचा कल होत आहे कमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - 2014-15 या वर्षात खान्देशासह राज्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये मोठय़ा संख्येने जागा रिक्त राहिल्या आहेत. अभियांत्रिकीकडे विद्यार्थ्यांचा कल कमी होत असल्याचे चित्र राज्यभरात निर्माण झाले आहे. यंदा राज्यात अभियांत्रिकीसाठी एक लाख 65 हजार जागा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. मात्र, केवळ एक लाख सहा हजार विद्यार्थ्यांनीच प्रवेशासाठी अर्ज केले. त्यापैकी आठ हजार फॉर्म विविध त्रुटींमुळे बाद झाले होते. खान्देशातील 12 महाविद्यालयांमध्ये सगळे कोर्स मिळून एकूण 5340 जागा उपलब्ध होत्या, त्यापैकी 2980 जागा पहिल्या फेरीअखेर रिक्त राहिल्या आहेत. आता दुसर्‍या फेरीनंतर पुढील चित्र स्पष्ट होणार आहे. एमएस कॅप आणि ऑल इंडिया या दोन परीक्षांच्या आधारावर ही आकडेवारी मंगळवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास डायरेक्ट ऑफ टेक्निकल एज्युकेशनच्या (डीटीई) वेबसाइटवर उपलब्ध होती.

प्रवेशाचा टक्का घसरण्याची ही आहेत कारणे
डिप्लोमा करून नंतर इंजिनिअरिंग करण्याकडे विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल
प्रवेशप्रक्रिया उशिरा सुरू झाली, त्यामुळे विद्यार्थी इतर शाखांकडे वळले
पहिल्या फेरीत केवळ एकच महाविद्यालयाचे ऑप्शन भरणे अनिवार्य केले
आरक्षित जागा पहिल्या फेरीत उपलब्ध नव्हत्या, त्या दुसर्‍या फेरीनंतर खुल्या करण्यात येणार आहे
पहिल्या फेरीअखेर निम्म्या जागा रिक्त
अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेच्या पहिल्या फेरीअखेर खान्देशातील 12 महाविद्यालयांमधील उपलब्ध जागेतील 47 टक्के जागा भरल्या गेल्या आहेत. उर्वरित जागांसाठी बुधवारपर्यंत (23 जुलै) दुसर्‍या फेरीत अर्ज करण्याची शेवटची मुदत आहे. अभियांत्रिकीच्या प्रवेशाचा टक्का यंदा घसरला आहे.
दुसर्‍या फेरीनंतर चित्र बदलेल
डिप्लोमानंतर अभियांत्रिकी, प्रवेशप्रक्रिया सुरू होण्यासाठी झालेला उशीर यासह अनेक कारणांमुळे यंदा अभियांत्रिकीच्या पहिल्या फेरीअखेर निम्म्या जागा रिक्त राहिल्या आहेत. दुसर्‍या फेरीनंतर हे चित्र बदलेल. तिसरी फेरी काउन्सिलिंगची असल्यामुळे दुसर्‍या फेरीत ठराविक महाविद्यालयांत जास्त जागा भरल्या जातील. डॉ.जे.बी.पाटील, अधिष्ठाता, अभियांत्रिकी विद्याशाखा, उमवि