आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पीसीएम ग्रुपच्या गुणांनुसारच अभियांत्रिकीची यादी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने अभियांत्रिकीत प्रथम वर्षाला विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी नोंदणीला सुरुवात झाली आहे. आजपावेतो दोन हजारांवर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या प्रवेशासाठीची अंतिम गुणवत्ता यादी पीसीएम अर्थात फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स विषयांतील गुणांनुसार जाहीर होणार आहे.

गेल्या वर्षापासून अभियांत्रिकी प्रवेशासाठी देशपातळीवर जेईई मेन्सच्या गुणांद्वारे प्रवेशप्रक्रिया राबवली जात आहे. यंदा बारावीचे गुण आणि जेईई मेन्स परीक्षेतील गुणांच्या आधारावर ही प्रवेशप्रक्रिया होणार आहे. पूर्वी केवळ राज्यस्तरावर घेण्यात आलेल्या स्वतंत्र प्रवेशपूर्व परीक्षेतील गुणांच्या आधारावरच ही प्रक्रिया होत होती. परंतु, गेल्या वर्षापासून या प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. या बदलानुसार यंदा ज्या केंद्रांवर विद्यार्थी नोंदणी करणार आहेत, त्याच ठिकाणी अ‍ॅप्लिकेशन कीटमध्ये त्यांना युजर आयडी आणि पासवर्ड मिळणार आहे. जेणेकरून घरबसल्यादेखील विद्यार्थी अर्ज भरू शकणार आहेत. प्रवेश मिळवण्याची प्रक्रिया आता खुपच सोपी झालेली आहे. विद्यार्थ्यांसह पालकांना महाविद्यालयांच्या दारी फिरण्याची गरज भासत नाही.
एसएमएस अलर्ट
अभियांत्रिकी प्रथम वर्ष प्रवेशासाठी नोंदणी आॅनलाइन केली जात आहे. प्रवेशासाठी आवश्यक असलेली अ‍ॅडमिशन कीट विद्यार्थ्यांनी घेतल्यानंतर त्या कीटमध्ये एक नंबर देण्यात येणार आहे. तो स्क्रॅच केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचा युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल. ही सर्व आॅनलाइन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना पुढील सर्व सूचना एसएमएसद्वारे देण्याची सुविधादेखील केली आहे.
शिक्षण शुल्कात सवलत
आतापर्यंत एससी, एसटी आणि अपंग तसेच इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शुल्कात सवलत मिळत होती. आता खुल्या गटातील आर्थिक मागास विद्यार्थ्यांसाठीही ट्युशन फी सवलत लागू केली आहे. यानुसार अर्ज प्रक्रियेतील सवलतीचा कोड विद्यार्थ्यांना निवडायचा आहे. या विद्यार्थ्यांसाठी पाच टक्के जागा दिल्या आहेत. त्यासाठी साडेचार लाखांपर्यंत उत्पन्न असणार्‍या विद्यार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागणार आहे.
व्होकेशनल विषयदेखील प्रवेशासाठी गृहीत
अर्ज प्रक्रियेसाठी पीसीएमबरोबरच व्होकेशनल विषयही प्रवेशासाठी गृहीत धरला जाईल, असे सांगण्यात आले होते. या नियमानुसार विद्यार्थी केवळ अर्ज करण्यास पात्र होतील. मात्र, पीसीएम व जेईई मेन्सचे मिळून जी टक्केवारी येईल, त्या आधारावरच प्रवेश मिळेल