आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियांत्रिकीची नोंदणी वाढली, खान्देशात 5 हजार ६०० जागा उपलब्ध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - अभियांत्रिकेच्या प्रवेश नोंदणीच्या वेळी सर्व्हर डाऊन झाल्याने २६ जूनपर्यंत एका दिवसाची मुदतवाढ मिळाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा नोंदणीचा टक्का वाढला आहे. खान्देशात उपलब्ध जागेपेक्षा जास्त नोंदणी झाल्याने प्रवेशाचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. डीटीईने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 2 जूनपासून अभियांत्रिकेच्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झाली होती. दरम्यान, प्रवेश नोंदणीच्या वेळी अडचणी आल्याने २५ऐवजी २६ जून अशी एका दिवसाची मुदतवाढ मिळाल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

चार फेऱ्यांमध्ये प्रवेश दिले जाणार आहेत. गेल्या वर्षी संपूर्ण राज्यात ४५ टक्के जागा रिक्त होत्या. ठरावीक महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थी, पालकांचा आग्रह असतो.
६१५७विद्यार्थ्यांची नोंदणी
संपूर्णराज्यात यंदा 1 लाख ४५ हजार जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी केवळ 1 लाख 6 हजार विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. जळगाव, धुळे नंदुरबार या तीन जिल्ह्यांसाठी 5 हजार ६०० जागा उपलब्ध आहेत, तर 6 हजार १५७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षी 4 हजार २०० विद्यार्थ्यांनीच नोंदणी केली होती.
२६ जूननंतरचे वेळापत्रक असे राहील
२७ जून : सायंकाळी वाजता पहिल्या फेरीचा निकाल जाहीर होणार.
२८जून ते 5 जुलै : एआरसीला आपला पर्याय (फ्रीज, स्लाइड, फ्लोट) देणे.
7 जुलै: सायंकाळी वाजता दुसऱ्या फेरीचा निकाल जाहीर होणार.
8 ते१२ जुलै : एआरसीला आपला पर्याय (फ्रीज, स्लाइड, फ्लोट) देणे.
१४ जुलै : सायंकाळी वाजता तिसऱ्या फेरीचा निकाल जाहीर होणार.
१५ते १८ जुलै : एआरसीला आपला पर्याय (फ्रीज, स्लाइड, फ्लोट) देणे.
२०जुलै : सायं.५ वाजता चौथ्या राऊंडसाठी रिकाम्या जागा जाहीर.
२१ ते २४ जुलै : चौथ्या फेरीसाठी नव्याने ऑप्शन फॉर्म भरणे.
२६जुलै : सायं. वाजता चौथ्या फेरीचा निकाल.
२७ते २९ जुलै : एआरसीला डीडी देऊन तात्पुरते प्रवेश देणे.
२८जुलै ते 6 ऑगस्ट : महाविद्यालयाला भेट देऊन प्रवेश निश्चित करणे.
बातम्या आणखी आहेत...