आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक १० सेकंदाला लोकेशनची माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जीपीएसयंत्रणेसारखेच परंतु त्यापेक्षा थोड्या जास्त प्रमाणात माहिती देणारे एक डिव्हाइस देवकर अभियांत्रिकी गोदावरी अभियांत्रिकी महा-विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांनी तयार केले आहे. हे डिव्हाइस बसवलेली दुचाकी, चारचाकी किवा अन्य कोणत्याही वस्तूचे दर १० सेकंदांनंतरचे लोकेशन सर्व्हरवर अपडेट होत असते.
गाेदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असलेला दर्पण पाटील देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयात मॅकेनिकल इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षाला असलेला संकेत पाटील या दोघांनी हे डिव्हाइस तयार केले आहे. हे डिव्हाइस तयार करण्यासाठी त्यांना अडीच हजार रुपयांचा खर्च आला आहे. जीपीएस यंत्रणेप्रमाणेच डिव्हाइसचे प्रत्येक १० सेकंदाला लोकेशन सांगणारे डिव्हाइस कामआहे. परंतु त्यात फेसबुक, गुगलसारख्या मोठ्या कंपन्या वापरत असलेल्या बीग डाटा बेसचा उपयोग करून अपडेट करण्यात आलेले आहे. त्यामुळे प्रत्येक १० सेकंदांनंतर नोंद घेणे, चारचाकीचे इंजिन सुरू आहे की बंद? किती कोणता दरवाजा उघडा आहे? एसी बंद आहे की सुरू? वाहन किती वेळ किलोमीटर फिरले? यासारख्या सूक्ष्म नोंदीदेखील यातून उपलब्ध होत असतात.

व्यक्तींचीही ठेवता येईल माहिती
अनेकमोठ्या कंपन्यांमध्ये साहित्य पोहोचवण्यासाठी कर्मचारी नियुक्त केलेले असतात. वेळीच साहित्य पोहोचावे, त्यासाठी कंपनीला बंधने असतात. अशा वेळी कर्मचाऱ्यांकडून वेळ पाळली जावी, अशी अपेक्षा कंपनीची असते. तसे झाल्यामुळे कंपनीचे नुकसानही होऊ शकते. हे नुकसान टाळण्यासाठी साहित्य पोहोचवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बॅगमध्ये हे डिव्हाइस बसवल्यास त्यांच्या वेळेची अपडेट माहिती कंपनीला मिळू शकते. त्यामुळे कामात होणारा आळशीपणावर नियंत्रण येऊ शकते, अशी माहिती दर्पण संकेत पाटील यांनी दिली.

गुगलची मदत
मोठ्या प्रमाणात डाटा संकलित करायचा असल्यामुळे या विद्यार्थ्यांनी गुगलच्या मदतीने बीग डाटा बेस भाडेतत्वाने घेतले आहे. डिव्हाइस संदर्भातील सर्व माहिती त्यावर अपडेट होत असते. दोन महिन्यांपर्यंतची माहिती सर्व्हरवर उपलब्ध राहत असून डिव्हाइस वापरकर्ते may my lorry.com या संकेतस्थळावर ही माहिती पाहू शकतात.

बातम्या आणखी आहेत...