आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थिनीचा शिक्षणाधिकार्‍यांच्या टेबलावर शिष्यवृत्तीसाठी ठिय्या!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - अभियांत्रिकीचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनीने शिष्यवृत्तीच्या मागणीसाठी माध्यमिक शिक्षण विभागात जाऊन वाद घातला. शिक्षणाधिकारी नसल्याने ती त्यांच्या टेबलावर जाऊन बसली. अन्य कर्मचारी न्याय देऊ शकत नसल्यामुळे वाद विकोपाला जाण्याची भीती होती. त्यामुळे शिक्षण विभागातील कर्मचार्‍यांनी थेट पोलिसांना बोलवणं केलं. पोलिस स्टेशनला आश्वासनानंतर वादावर पडदा टाकण्यात आला.

केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रवर्गनिहाय शिष्यवृत्ती दिली जाते. शिवकॉलनीत राहणारी विद्यार्थिनी रार्जशी चौधरी हिला इयत्ता नववी आणि दहावीपर्यंत शिष्यवृत्ती मिळाली होती. त्यानंतर अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना शिष्यवृत्ती मिळाली नाही. ती मिळावी हे विचारण्यासाठी रार्जशीने शुक्रवारी सकाळी माध्यमिक शिक्षण विभागातील कर्मचार्‍यांशी चर्चा केली. शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर कार्यालयात नव्हते. त्यामुळे ती त्यांच्या टेबलावर जाऊन बसली. कर्मचार्‍यांना तिला आवरणे कठीण झाले. परिणामी, तेथे कार्यरत असलेले एच.डी.पाटील यांनी शहर पोलिस ठाण्याला फोन लावला. तेथील महिला पोलिसांनी रार्जशीला पोलिस ठाण्यात नेले. पोलिस निरीक्षकांनी तिची समजूत घालण्याचा प्रय} केला. पण ती ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती.

वाद निवळला
कागदपत्रे तपासून सोमवारी शिक्षणाधिकार्‍यांशी चर्चा करण्याचे आश्वासन तिला दिल्यानंतर वाद निवळला. रार्जशीने संताप व्यक्त केल्यानंतर शिक्षणाधिकारी हिंगोणेकर नसल्याने त्यांच्या दालनास कुलूप लावण्यात आले.