जळगाव-१० वर्षांपासून शहरातील मालमत्तांचे फेर मूल्यांकन झालेले नाही. त्यामुळे मालमत्ता करातही वाढ झाली नाही. सद्या महापालिका कर्मचाऱ्यांकडून सुरू असलेले माेजणीचे काम जलदगतीने हाेण्यासाठी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची मदत घेण्याचा विचार प्रशासन करीत अाहे. जेवढ्या मालमत्ता कराची रक्कम वाढेल, त्याच्या एक टक्का रक्कम महाविद्यालयांना देण्याची तयारी सुरू अाहे.
महापालिका क्षेत्रात सुमारे ८० हजार मालमत्ता अाहेत. या मालमत्तांमध्ये गेल्या १० ते १५ वर्षांत अनेक बदल झाले अाहेत. परंतु महापालिकेच्या दप्तरी त्याची काहीही नाेंद नाही. अनेकांनी घरे दुमजली करून त्या माध्यमातून ते भाडेकरूंचे उत्पन्न घेत अाहेत. यात पालिकेचे अार्थिक नुकसान हाेत अाहे. त्यामुळे गेल्या दाेन महिन्यांपासून पालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत शहरातील मालमत्तांचे माेजमाप करण्याचे काम सुरू अाहे. त्यानंतर करमूल्य निर्धारण केले जाणार अाहे. परंतु शहरातील मालमत्तांची संख्या पाहता हे काम जलदगतीने करण्यासाठी पालिका प्रशासन वेगवेगळ्या पर्यायांच्या शाेधात अाहे.
नाेंदणीकृत सर्व्हेयरचाही पर्याय
शहरातनाेंदणीकृत सर्व्हेयर असून महापालिकेशी संबंधितही काही नाेंदणीकृत अाहेत. अशा व्यक्तींच्या माध्यमातूनही अचूक माेजणी करण्यासाठी प्रयत्न सुरू अाहे. नाेंदणीकृत सर्व्हेयर महाविद्यालय यांच्यापैकी जे तयार असतील, त्यांना कामाची जबाबदारी साेपवली जाणार आहे. त्या दृष्टीने प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.
शहरात १० वर्षांपूर्वी तळ मजल्यावर बांधकाम असलेल्या नागरिकांनी अाता दाेन मजली बांधकाम करून घेतले अाहे. त्याची नाेंदही नगररचना विभागात अाहे. परंतु मालमत्ता कराच्या अाकारणीच्या रजिस्टरमध्ये त्याची नाेंद नाही. त्यामुळे प्रशासन पूर्वीच्याच बांधकामाच्या अाधारे कराची अाकारणी करत अाहे. शहराचा वाढता विस्तार विकास पाहता पुढच्या वर्षी मालमत्ता कराच्या रकमेत ३० ते ४० टक्के वाढ अपेक्षित अाहे.
विद्यार्थ्यांचा प्राेजेक्टही हाेईल मनपाचे कामही
अभियांत्रिकीमहाविद्यालयातील तिसऱ्या चाैथ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना प्राेजेक्ट करावा लागताे. यासाठी त्यांना वेगवेगळ्या विषयांचे सादरीकरण करावे लागते. परंतु महापालिकेच्या माध्यमातून मालमत्तांचे फेर मूल्यांकन केल्यास प्रशासनाचे कामही पूर्ण हाेणार अाहे. तसेच यामुळे जेवढ्या मालमत्ता वाढतील कराची रक्कम वाढेल, त्यातील एक टक्का रक्कम संबंधित महाविद्यालयांना देण्याची तयारी प्रशासनाने चालवली अाहे.