आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्रजी विषयाच्या गोडीसाठी हवेत विद्यार्थीकेंद्रित वर्ग : जॉन परमहं

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव : प्रात्यक्षिक प्रयोगाद्वारे विविध अध्ययन - अध्यापन तंत्राचा वापर करून आनंददायी शिक्षणाचा अनुभव विद्यार्थ्यांना करून दिला पाहिजे. त्याला इंग्रजी शिक्षणाची गोडी लागावी म्हणून प्रत्येक इंग्रजी शिक्षकाने आपला वर्ग विद्यार्थी केंद्रित करावा, असे आवाहन ब्रिटिश कौन्सिलचे कार्यक्रम अधिकारी जॉन परमहं यांनी जळगाव येथे आयोजित इंग्रजी विषय शिक्षकांच्या विभागीय परिषदेत केले.

राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अर्थात आरएमएसए ब्रिटिश कौन्सिलच्या इलिस प्रोजेक्ट अंतर्गत इंग्रजी विषय शिक्षकांची विभागीय परिषद गुरुवारी गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झाली. अध्यक्षस्थानी डी.आय.ई.सी.पी.डीचे प्राचार्य अरुण सोनार होते. परिषदेचे उद्घाटन माजी खासदार डॉ. उल्हास पाटील डॉ. वर्षा पाटील यांनी केले. 

प्रमुख पाहुणे म्हणून डी.आय.ई.सी.पी.डीचे अधिव्याख्याता प्रा. डॉ. डी. बी. साळुंखे, उपशिक्षणाधिकारी विकास पाटील, गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या नीलिमा चौधरी, भुसावळचे गटशिक्षणाधिकारी विजय पवार, मुख्याध्यापिका विद्या मुजूमदार, डॉ. जगदीश पाटील यांच्यासह जिल्ह्यातील इंग्रजी समुपदेशक मेंटॉर उपस्थित होते.
 
प्रास्ताविकात उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर यांनी करून इलिस प्रोजेक्टचा आढावा घेतला. या वेळी जिल्हा मेंटॉर भरत शिरसाठ यांनी संपादित केलेल्या विभागीय परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. श्री संत गाडगे महाराज हिंदी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी संभाषणाचे सादरीकरण केले. सूत्रसंचालन मेंटॉर प्रमोद आठवले यांनी तर आभार उपशिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी मानले. 

खेळकृतियुक्त अध्यापनातून आनंददायी वर्ग : यावेळी जॉन परमहं यांनी शिक्षकांसाठी वर्गात वापरावयाची वेगवेगळ्या अध्यापनाच्या पद्धती तंत्रे सांगितली. ते पुढे म्हणाले की, जिल्हा समुपदेशकांनी विद्यार्थी केंद्रित वर्ग तयार करण्यासाठी सहकार्य करावे. अध्ययन - अध्यापन, प्रभावी अध्यापन, विद्यार्थी केंद्रित अध्यापन अशा विविध मानसशास्त्रीय संकल्पना समजून घ्याव्यात. 

खेळातून कृतियुक्त अध्यापनातून आनंददायी वर्ग तयार करावा. त्यासाठी प्रत्यक्ष स्वानुभव विद्यार्थ्यांच्या पूर्वानुभवाचा यात वापर करावा. या वेळी त्यांनी तीन वर्षांपासून सुरू असलेल्या इलिस प्रोजेक्टचा आढावा घेऊन इंग्रजी विषय अध्यापनात आमूलाग्र बदल झाल्याचे सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...