आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्रजी साहित्यातून मानवी समाजाचे चित्रण मू.जे.महाविद्यालयातील आंतरराष्ट्रीय परिषदेतील सूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव : जगातील बहुतांश सहित्य इंग्रजी भाषेत उपलब्ध असून यात मानवी समाजाचे चित्रण अधोरेखित झालेले आहे. संस्कृती कालानुरूप बदलत असली तरी तिचे रूप त्या-त्या वेळेच्या साहित्यात पाहायला मिळते, असा सूर शनिवारी मू.जे.महाविद्यालयातील आंतरराष्ट्रीय परिषदेत निघाला. 
 
मू. जे. महाविद्यालयातील इंग्रजी विभाग, नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी इंग्लिश टिचर्स असोसिएशन आणि ऑल इंडिया नेटवर्क ऑफ इंग्लिश टिचर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आणि रिजनल इंग्लिश लँग्वेज ऑफिस यू.एस.अॅम्बसी इंडिया (रेलो) ब्रिटिश कौन्सील, इंडिया यांच्या सहकार्याने ‘भाषा, साहित्य आणि संस्कृती : नवे प्रवाह’ या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप शनिवारी झाला. 
 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केसीई संस्थेचे संचालक सदस्य विद्याधर पानट हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संचालक मंडळातील सुनील चौधरी, डॉ. अ. न. माळी, प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी, परिषदेचे समन्वयक प्रा. डॉ. भूपेंद्र केसुर, ऑल इंडिया नेटवर्क ऑफ इंग्लिश टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.अमोल पदवड, नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी इंग्लिश टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.ए.पी.खैरनार उपस्थित होते.
 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.पंडित चव्हाण प्रा.योगिनी राजपूत यांनी केले. प्रा.दीपक चौधरी यांनी आभार मानले. या वेळी माेठ्या संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती हाेती. 
 
४० शाेधनिबंध सादर 
परिषदेत सकाळच्या सत्रात ४० संशोधकांनी आपले शोधनिबंध सादर केले. यानंतर समांतर चर्चासत्रात डॉ.झेड.एन.पाटील डॉ.अनिल पाठक यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत डॉ.कृष्ण दीक्षित डॉ. अनिल पाठक यांनी सहभागी संशोधकांना मार्गदर्शन केले. समारोपाप्रसंगी परिषदेचे समन्वयक डॉ. केसुर यांनी दोन दिवसांचा अहवाल सादर केला. 
बातम्या आणखी आहेत...