आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्रजी शाळांत तुकड्या वाढल्या; मराठीचाही यंदा टक्का वधारला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - सेमी इंग्लिशसारखा प्रभावी पर्याय निर्माण झाल्यामुळे मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांचा टक्का वाढला अाहे. शहरात यंदा सगळ्या मराठी शाळांमध्ये तब्बल लाख ८२ विद्यार्थी शिक्षण घेणार अाहेत. दुसरीकडे इंग्रजी शाळांचा दबदबाही कमी झालेला नाही. शुल्कात माेठी वाढ करूनही इंग्रजी शाळांमध्येे प्रवेश घेण्यासाठी यंदा गर्दी झालीच. त्यामुळे अातापर्यंत केवळ ए,बी,सी या तीन तुकड्यांपर्यंत असलेले वर्ग थेट एफ तुकडीपर्यंत नेण्याची वेळ या शाळांवर अाली अाहे. त्यातही विद्यार्थी संख्या मर्यादित नसल्याचे घेतलेल्या माहितीवरून दिसून अाले.
शहरात सद्य:स्थितीत मराठी माध्यमाच्या हजार ७५८ शाळा आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेच्या हजार १०५ मराठी उर्दू शाळांचाही समावेश आहे. यातील सगळ्या शाळांमध्ये यंदा विद्यार्थी संख्येत वाढ झाली अाहे. मुळात मुलांना इंग्रजी शिक्षण देता यावे, ही इच्छा असलेल्या पालकांना सेमी इंग्रजीचा पर्याय मराठी शाळांमधून सापडला अाहे. यानंतर हिंदी माध्यमाच्या दोन, उर्दू ९२ तर इंग्रजी माध्यमाच्या सुमारे १०८ शाळा आहेत. गेल्या चार वर्षांत मराठी माध्यमापेक्षा इंग्रजी माध्यमाच्या सुमारे ७० शाळा अधिक वाढल्या आहेत. त्यापैकी काही शाळा बंद झाल्या आहेत; परंतु त्यांची संख्या बोटावर मोजण्याइतपत आहे. शिवाय विद्यार्थी संख्येएेवजी तांत्रिक कारणामुळे या शाळा बंद पडल्या आहेत. मागील तीन ते चार वर्षांप्रमाणे यंदाही इंग्रजी शाळांकडे प्रवेश घेण्याचा कल वाढता आहे. त्यामुळे वर्षाला १० ते १४ हजार रुपयांपर्यंत या शाळांची वार्षिक फी पोहाेचली आहे. त्या तुलनेत मराठी शाळांची वार्षिक फी कमी असली तरी अधिक पैसे मोजून पालक इंग्रजी शाळांकडे वळत आहेत.
ही आकडेवारी अर्थातच इंग्रजी शाळांचा वाढलेला टक्का आणि मराठी इतर माध्यम शाळांकडे होणारे दुर्लक्ष याकडे अंगुलीनिर्देश करते. इंग्रजी शाळांकडे पालकांचा ओघ वाढू लागल्यामुळेच आता बहुतांशी सर्वच शाळांमध्ये वर्गखोल्या कमी पडू लागल्या आहेत. त्याला पर्याय म्हणून यंदा काही शाळांनी अक्षरश: एफपर्यंत वर्गखोल्या वाढविल्या आहेत. एका वर्गात सरासरी ५० ते ६० विद्यार्थी गृहीत धरले तरी वाढलेल्या एका वर्गामुळे विद्यार्थी संख्याही मोठी झाली आहे. त्यामुळे जास्तीचे वर्ग वाढविण्याची वेळ शिक्षण संस्थांवर आली आहे.
सुविधांचा अभाव...
शाळाचकाचक दिसत असल्या तरी सुविधांचा मात्र अभाव जाणवून येतो. याकडे शिक्षण विभागही दुर्लक्ष करते. पिण्याच्या पाण्यासाठी एकाच ठिकाणी विद्यार्थी गर्दी करतात.
विद्यार्थ्यांना ताण...
खासगी इंग्रजी शाळा डोनेशन घेऊन मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना प्रवेश देतात. मात्र बसायला पुरेशी जागा नसल्यामुळे वर्ग वाढवून पत्र्यांच्या खोल्यातही मुलांना बसवतात. शिक्षक वर्गही पुरेसा नसतो.
पहिल्याच दिवशी हाेणार स्वागत
मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये बुधवारी पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना पाठ्यपुस्तके दिली जातील. त्याचबराेबर त्यांना गणवेशही दिला जाईल. ढाेलताशांच्या गजरात त्यांचा प्रवेशाेत्सव हाेणार अाहे. तशा सूचना शाळांना देण्यात अाल्या अाहेत.
विद्यार्थी सं‌ख्येत वाढ
शिक्षणविभागाच्या आकडेवारीनुसार धुळ्यात चार लाख ४४ हजार ७१३ विद्यार्थी आहेत. यापैकी मराठी माध्यमाच्या सर्व शाळांमधील तीन लाख ८२ हजार ३५, हिंदी शाळांमध्ये १९१, उर्दू माध्यमामध्ये ३१ हजार ९१, इंग्रजी शाळांमध्ये ३१ हजार ३९६ विद्यार्थी शिकत असल्याची माहिती अिधकाऱ्यांकडून देण्यात आली.
मनपा शाळा ६२ वरून २३ वर
महापािलकेच्याशाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्यांची स्थिती ही फारशी चांगली म्हणता येणार नाही. गेल्या अनेक वर्षांत त्यांची विद्यार्थी संख्या ही सतत घटते आहे. त्यामुळे कधीकाळी ६२ शाळांमधून अ,ब,क,ड चे शिक्षण देणारे वर्ग पाठोपाठ शाळांची संख्याही थेट २३ वर आली आहे. यात १२ मराठी, ११ उर्दू माध्यम शाळांचा समावेश आहे. गेल्या वर्षी या शाळांमध्ये दोन हजार ९६० विद्यार्थी होते. तथापि कालौघात चार विनाअनुदानित इंगजी माध्यमाच्या मनपा शाळांमधून अ,ब,क, सोबतच ए,बी,सी,डी देखील शिकविण्यात येत आहे; परंतु पालक याची दखल घेत नाही; परंतु मनपा शाळा वगळता इतर बहुतांश मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेशाची टक्केवारी वाढली आहे. त्यामुळे मुलांची पटसंख्याही वाढणार आहे.
हिंदी-उर्दूलाही धोबीपछाड
मराठीप्रमाणेहिंदी उर्दू शाळांचीही इंग्रजी शाळांच्या तुलनेत वाढ झालेली नाही. त्यामुळेच विद्यार्थी संख्येचा दरही वाढू शकला नाही. हिंदीच्या तुलनेत उर्दू शाळांची संख्या अधिक असली तरी इंग्रजी माध्यम शाळांमधील विद्यार्थी संख्या त्यापेक्षा अधिक आहे. शिवाय हिंदी उर्दू या दोन्ही माध्यमांची विद्यार्थी संख्येची एकत्र बेरीज केली तरी ती ३१ हजार २८२ एवढीच होते. इंग्रजी शाळेच्या एकूण विद्यार्थी पटसंख्या ३१ हजार ३९६ पेक्षा तब्बल ११४ ने कमी होती, असे दिसून आले.