आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • English Speaking Training For CBSE Students In Jalgaon

स्तुत्य उपक्रम: सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना संभाषण कौशल्याचे धडे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- वाढत्या स्पध्रेत विद्यार्थी मागे पडू नयेत म्हणून केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) नववी ते अकरावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना संभाषण कौशल्याचे धडे दिले जाणार आहेत. तत्पूर्वी शिक्षकांनाही हे प्रशिक्षण देण्याची तयारी सीबीएसईने केली आहे. त्यासंदर्भातील प्रयत्‍न अंतिम टप्प्यात आले असून लवकरच शिक्षकांचे प्रशिक्षण सुरू होणार आहे.

या उपक्रमासाठी सीबीएसईने लंडनमधील ट्रिनिटी कॉलेजसोबत करार केला आहे. गुणवंत विद्यार्थी तयार होण्यासाठी आधी शिक्षकांनी परिपूर्ण असावे. या उद्देशातून शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे. सप्टेंबर, नोव्हेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यात प्रशिक्षणाचा कार्यक्रम होणार असल्याची प्राथमिक माहिती सीबीएसईने संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.

10 गुणांचा फायदा

सीबीएसईने सुरू केलेल्या या नवीन उपक्रमाचा विद्यार्थ्यांना दुहेरी फायदा होणार आहे. उत्कृष्ट संवादकौशल्यासह 10 गुणांचा लाभ विद्यार्थी घेऊ शकणार आहे. प्रत्येक शाळेत हा उपक्रम राबवण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांना स्टेजवर जाऊन संवादकौशल्याची चाचणी द्यावी लागणार असून, त्यासाठी 10 गुण ठेवण्यात आले आहेत.