आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटिश कौन्सिल सुधारणार इंग्रजी भाषेचा दर्जा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचा इंग्रजी विषयाचा गुणात्मक दर्जा सुधारण्याच्या उद्देशाने ब्रिटिश कौन्सिलकडून इंग्रजी विषय शिकवणार्‍या शिक्षकांना प्रशिक्षित करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. पहिल्या टप्प्यात 700 शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. अलीकडे इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे कल वाढला आहे. त्यामुळे मराठी माध्यमांच्या शाळांमध्येही आता सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू झाले आहेत.
प्राथमिक शिक्षण घेऊन इयत्ता नववी, दहावीला येणार्‍या विद्यार्थ्यांची इंग्रजी भाषा हा विषय कमकुवत असल्याचे अनेक सर्वेक्षणातून पुढे आले आहे. इंग्रजीचा गुणात्मक दर्जा सुधारावा या उद्देशाने ब्रिटिश कौन्सिलकडून प्रशिक्षण घेतले जाणार आहे. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानातर्फे निधी उपलब्ध झाला आहे. ‘इलिस’(इंग्लिश लँग्वेज लिट फॉर सेकंडरी स्कूल) या माध्यमातून ब्रिटिश कौन्सिलने प्रशिक्षणाची जबाबदारी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेवर सोपवली आहे. प्रशिक्षण सोमवारपासून जळगाव व भुसावळ या दोन केंद्रांवर होईल.
प्रशिक्षणानंतर आढावा घेणार
ब्रिटिश कौन्सिलच्या माध्यमातून होणारे प्रशिक्षण उपयुक्त ठरतात. या कौन्सिलने स्वत: प्रशिक्षण देऊन तज्ज्ञ प्रशिक्षक तयार केले आहेत. शिक्षकांना फक्त प्रशिक्षण देऊन थांबणार नाही. तर प्रशिक्षण घेतलेले शिक्षक त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करत आहेत की नाही याचा आढावा घेतला जाईल. प्रशिक्षणासाठी माध्यमिक शिक्षण विभागाला सहभागी करून घेण्यात आले आहे. - आय.सी. शेख, प्राचार्य, डाएट
एक शाळा, एक शिक्ष्रक
प्रशिक्षण 7 ते 11 जुलै आणि 14 ते 18 जुलैदरम्यान घेण्यात येणार आहे. ब्रिटिश कौन्सिलच्या तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यात माध्यमिक विभागाच्या शासकीय शाळा आणि अनुदानित माध्यमिक शाळांमधील शिक्षकांचा समावेश केला जाणार आहे. एका शाळेतून एक शिक्ष प्रशिक्षणासाठी बोलावण्यात आला आहे.
जळगाव, भुसावळात वर्ग
जळगाव आणि भुसावळ केंद्रांवर प्रशिक्षण होईल. जळगाव येथे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत दोन वर्ग, बाहेती महाविद्यालय आणि शासकीय अध्यापक विद्यालयात प्रत्येकी दोन वर्ग असे सहा वर्ग जळगाव शहरात होतील. तर भुसावळ येथील बियाणी हायस्कूलमध्ये चार वर्ग घेण्यात येणार आहेत. भुसावळ लगत तालुक्यातील शिक्षक भुसावळ केंद्रांवर प्रशिक्षण घेतील.