आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुढचे पाऊल: आता पीएफही होणार ‘डिजिटल’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- कर्मचार्‍यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम खात्यात भरणे, खाते हस्तांतरण करणे यांसारखी कामे यापुढे कार्यालयात बसून करता येण्यासाठी भविष्य निर्वाह निधी संगठण कार्यालयाकडून ‘डिजिटल स्वाक्षरी’ नोंदणी सुरू झाली आहे.

ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पीएफमधील सभासदांचे रक्कम हस्तांतरण दावे वेगाने निकाली काढता येणे शक्य होणार आहे. ही महत्त्वाकांक्षी योजना दोन महिन्यात ऑनलाइन होण्याची शक्यता आहे. ज्याचा फायदा पीएफ संदर्भातील सगळ्यांनाच होणार आहे. सद्यस्थितीत अनेक मालकांना आपल्याकडील कर्मचार्‍याच्या खात्यात पीएफचे हस्तांतरण झाले की नाही किंवा जो कर्मचारी आस्थापना सोडून गेला आहे, त्याचा हस्तांतरण दावा निकाली काढण्यात आला आहे की नाही याबाबतची माहिती नसते. कर्मचार्‍यालाही त्याच्या दाव्याची सद्यस्थिती काय आहे याची माहिती नसते यासर्व समस्यांवर डिजिटल स्वाक्षरी हा एक पर्याय ठरणार आहे. पीएफ कार्यालयाकडे नोंदणीकृत असलेल्या सर्व आस्थापनांनी डिजिटल सिग्नेचरची नोंदणी करावी याकरिता विशेष मोहीम राबविण्यात येत असून आस्थापना मालकांनी 15 ऑगस्ट 2013 पर्यंत ‘डिजिटल स्वाक्षरी’ नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याबाबतची सविस्तर माहिती www.epfindia.com, www.epfindia.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अशी मिळविता येणार कर्मचार्‍यांना सुविधा
डिजिटल सिग्नेचरकरिता आस्थापनांना सॉफ्टवेअर खरेदी करावे लागेल, ज्यांना हे शक्य नाही त्यांना एमटीएनएल, टीसीएस यांसारख्या सरकारी मान्यता प्राप्त संस्थांकडून डिजिटल सिग्नेचर अपलोड करावी लागेल, त्याकरिता शुल्क भरावे लागेल. अपलोड केल्यानंतर परिशिष्ट ‘अ’ भरून त्याच्या दोन प्रती पीएफ कार्यालयाला जमा कराव्या लागतील. ही डिजिटल सिग्नेचर म्हणजे युनिक सिग्नेचर असल्याने त्यात सुरक्षितता आहे. केवळ पीएफच नाही, तर सर्व ऑनलाइन व्यवहारांकरिता ती उपयुक्त ठरेल.

सुविधेची वैशिष्ट्ये
सभासदांनी केलेल्या हस्तांतरण विनंतीची माहिती मिळू शकेल.
तुमच्या रेकॉर्डसची माहिती मिळविता येणार.
डिजिटल स्वाक्षरी वापरून माहितीला मंजुरी देता येणार.
कागदांशिवाय दावे प्रक्रिया पूर्ण होऊ शकेल.
एका आस्थापनेकडून तीन लोकांना डिजिटल स्वाक्षरी नोंदविता येणार असून ती दाव्यांची विनंती तपासणे आणि तिला मंजुरी देण्यासाठीही वापरता येईल.