आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एरंडाेलमध्ये सशस्त्र दराेडा, दाेन लाखांचा एेवज लंपास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- एरंडाेलशहरातील म्हसावद रस्त्यावरील ग्रामीण रुग्णालयासमाेर गुरुवारी पहाटे वाजेच्या सुमारास दराेडेखाेरांनी धुमाकूळ घालून सुमारे दाेन लाखांचा एेवज लंपास केला अाहे. एका ठिकाणी तर दराेडेखाेरांनी वृद्धेच्या कानातले दागिने अाेरबाडून काढले. तसेच तिच्या प्राध्यापक मुलीला जबर मारहाण करून आठ ताेळे साेने लंपास केले अाहे.
म्हसावद रस्त्यावर प्रल्हाद तुकाराम लिंग यांच्या घरात पाचाेरा तालुक्यातील सामनेर येथील बेबाबाई भानुदास पाटील (वय ६२) या त्यांची मुलगी रेखा भानुदास पाटील (वय ३१) यांच्यासाेबत राहतात. रेखा या एरंडाेल महाविद्यालयात प्राध्यापिका अाहेत. गुरुवारी पहाटे वाजेच्या सुमारास त्यांच्या स्वयंपाकघराच्या मागच्या लाेखंडी दरवाजाचे कुलूप तोडून चार ते पाच दराेडेखाेरांनी घरात प्रवेश केला. त्या वेळी अावाज अाल्याने बेबाबाई यांना जाग अाली.
त्यांनी अारडाअाेरड केल्याने त्यांना लाेखंडी टॉमीने मारहाण करून चाकूचा धाक दाखवून कानातील दागिने अाेरबाडून काढले. तसेच गळ्यातील मंगळसूत्रही अाेढले. त्यानंतर दराेडेखाेरांनी त्यांचा माेर्चा रेखा पाटील यांच्याकडे वळवला. त्यांनाही डाेक्यात लाेखंडी टॉमीने वार करून जखमी केले. तसेच गळ्यातील साेन्याची चैनही ताेडली. दाेन चाेरट्यांनी घरातील कपाटातील सामान अस्ताव्यस्त फेकले. दराेडेखाेरांनी १० मिनिटे धुमाकूळ घालून घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर बेबाबाई यांनी घडलेला प्रकार त्यांच्याच बाजूला त्यांचे दीर राहतात त्यांना सांगितला.

लगेचच त्यांनी सामनेर येथे त्यांच्या घरी माहिती िदली. त्यानंतर सामनेर येथे शेती आणि बांधकाम मटेरियल सप्लाय करणारे रेखा यांचे भाऊ रवींद्र आणि प्रमाेद यांनी तत्काळ घटनास्थळी येऊन दाेघांना जळगाव येथे राजस हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात अाले अाहे.
एरंडाेल येथे दराेडेखाेरांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या प्रा. रेखा पाटील
बातम्या आणखी आहेत...