आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एरंडोलच्या बेपत्ता कापूस व्यापा-याचा निर्घृन खून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धरणगाव - शहरातीलमाळीवाडा भागाजवळून वाहणा-या निम्न डाव्या कालव्यात सोमवारी सकाळी पोत्यात बांधून पाटात टाकलेला मृतदेह वाहून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा मृतदेह एरंडोल येथील शनिवारपासून बेपत्ता झालेले बाळू रामा पाटील (वय ४२) राजहांगिरपु-यातील व्यापा-याचा असल्याची माहिती मिळाली. मृतदेह असलेले पोते पाण्यातून बाहेर काढल्यानंतर त्यांची ओळख पटवण्यात आली. त्यांचा गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून एक डोळा फोडून खून झाल्याचे दिसून आले आहे.

शनिवारपासून बेपत्ता
बाळूरामा पाटील हे कापसाचे व्यापारी होते. ते शनिवार दि. ३१ रोजी रात्री आठ वाजेपासून बेपत्ता होते. एरंडोल-हिंगोणे रस्त्यावरील पाटावर त्यांची मोटारसायकल (क्रमांक एमएच- १९, व्हीआर- १०५२) आढळून आली. पण ते मिळून आले नाहीत. त्यांनी आत्महत्या केली असावी असा संशय निर्माण झाला; मात्र प्रत्यक्षात मृतदेह सापडल्यावर त्यांचा खून झाल्याचे दिसून आले. हा खून पैशांसाठी झाला नसून दुस-याच कारणासाठी झाल्याची शक्यता आहे.