Home »Maharashtra »North Maharashtra »Jalgaon» Ex-Mla Adv. Sharad Vani Passed Away

माजी अामदार अॅड. शरद वाणी यांचे निधन आज अंत्ययात्रा

प्रतिनिधी | Oct 11, 2017, 09:44 AM IST

  • माजी अामदार अॅड. शरद वाणी यांचे निधन आज अंत्ययात्रा
जळगाव-माजीअामदार अॅड. शरद साेनू वाणी (वय ७६) यांचे मंगळवारी (दि.१० ) सायंकाळी ६.३० वाजता दीर्घ अाजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा बुधवारी सकाळी वाजता नवीपेठेतील बाॅम्बे लाॅजच्या मागील राहत्या घरापासून निघणार अाहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दाेन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार अाहे.

ते श्यामकांत साेनू वाणी यांचे माेठे बंधू तर चंद्रशेखर शैलेश वाणी यांचे वडील हाेत. माजी अामदार सुरेश जैन यांचे खंदे समर्थक अशी अाेळख असलेले अॅड. वाणी यांनी १९९५ ते २००७ पर्यंत सलग १२ वर्ष विधान परिषदेत जळगावचे प्रतिनिधीत्व केले. अपक्ष शिवसेनेचे अामदार अशी त्यांची अाेळख हाेती. सुरेश जैन हे नगरपालिकेत नगराध्यक्ष असताना सलग साडेसहा वर्ष उपनगराध्यक्षपदाची धुरा अॅड. वाणी यांनी यशस्वीपणे सांभाळली हाेती. राजकारणात सक्रिय असतानाही त्यांनी अनेक वर्ष वकिली केली. गेल्या सहा वर्षांपासून त्यांची प्रकृती खालावली हाेती.

Next Article

Recommended