आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी अामदार मनीष जैनसह चाैघांना शिक्षा, महावीर साेसायटीचे धनादेश अनादर प्रकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महावीर अर्बन काे-अाॅप. साेसायटीचे तत्कालीन चेअरमन माजी अामदार मनीष जैन यांच्यासह चाैघांना धनादेश अनादरप्रकरणी साेमवारी न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा ठाेठावली. तसेच दाेन वेगवेगळ्या प्रकरणांत ११ काेटी रुपयांचा दंड ठाेठावण्यात अाला. दरम्यान, २५ हजार रुपयांचा दंड भरून जैन यांना तत्काळ जामीनही मंजूर करण्यात अाला.
महावीर साेसायटीने सन २००२ मध्ये िजल्हा बँकेकडून १० काेटींचे कर्ज घेतले हाेते. त्यापाेटी िजल्हा बँकेला िदलेले दाेन धनादेश वटता परत अाले हाेते. या प्रकरणी २००३ मध्ये जिल्हा बँकेचे कर्मचारी िभला पाटील यांनी जळगाव जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला हाेता. या प्रकरणाचा िनकाल न्यायाधीश ए.एम.मानकर यांनी साेमवारी िदला. त्यात माजी अामदार मनीष जैन यांच्यासह चाैघांना काेटींची नुकसान भरपाई अाणि वर्ष साध्या कैदेची िशक्षा सुनावली अाहे. तसेच दुसऱ्या धनादेश अनादर प्रकरणात ितघांना वर्ष साधी कैद अाणि काेटी रुपयांच्या नुकसान भरपाईची िशक्षा सुनावली अाहे.
दाेनवेेगवेगळ्या िशक्षा : अाॅक्टाेबर२००३ ला महावीर साेसायटीने काेटींचा धनादेश िदला हाेता. त्यावर चेअरमन मनीष जैन, व्हाइस चेअरमन सुरेंद्र नथमल लुंकड, कार्यकारी संचालक सुभाष सागरलाल सांखला अाणि व्यवस्थापक िवश्वनाथ रामसिंग पाटील यांच्या सह्या हाेत्या. या प्रकरणी न्यायाधीश मानकर यांनी संबंिधतांनी काेटी रुपये नुकसान भरपाई महिन्याच्या अात देण्याची अाणि वर्ष साध्या कैदेची िशक्षा सुनावली. तसेच दुसरा धनादेश काेटी २८ लाख ३३ हजार रुपयांंचा िदला हाेता. त्यावर सुभाष सांखला, सुरेंद्र लुंकड अाणि िवश्वनाथ पाटील यांच्या सह्या हाेत्या. त्यात न्यायाधीशांनी वर्षाची साधी कैद अाणि काेटी रुपयांची नुकसान भरपाई िजल्हा बँकेला महिन्याच्या अात देण्याचे अादेश िदले अाहेत.
काेटींचे कर्ज
महावीरपतसंस्थेने िजल्हा बँकेकडून २२ सप्टेंबर २००२ रोजी १० काेटी रुपयांच्या कर्जाची मागणी केली हाेती. त्यानुसार प्रथम २८ सप्टेंबर २००२ राेजी काेटी, १९ अाॅक्टाेबर २००२ राेजी काेटी, ११ नाेव्हेंबर २००२ ला दीड काेटी १८ नाेव्हेंबर २००२ ला दीड काेटी असे एकूण काेटींचे कर्ज िदले हाेते.