आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ex MLA Saniya Kadari Case, Santosh Chaudhari Farar

बिल्डर सानिया कादरी खंडणी प्रकरण: संतोष चौधरी फरार, विजय चौधरींना अटक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- बांधकाम व्यावसायिक सानिया कादरीने दाखल केलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात पोलिसांनी शनिवारी पहाटे माजी आमदार संतोष चौधरी, राष्ट्रवादीचे नगरसेवक विजय चौधरी यांचे निवासस्थान गाठले. यापैकी चौधरी घरी सापडल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली, तर चौधरी यांचा ठावठिकाणा लागला नाही. या प्रकरणातील अजून एक संशयित अनिल चौधरी हद्दपार आहेत.

माजी आमदार संतोष चौधरी, त्यांचे बंधू अनिल चौधरी, विजय चौधरी यांच्यासह अन्य तिघांनी घरात घुसून दरोडा टाकला. खंडणीच्या मागणीसाठी बंदुकीचा धाक दाखवून धमकी दिल्याचा आरोप सानिया कादरीने 20 डिसेंबर 2010 रोजी केला होता. यासंदर्भात सानियाने 2011 मध्ये भुसावळ न्यायालयात खासगी खटला दाखल केला. यानंतर न्यायालयाने पोलिसांना चौकशीचे आदेश देताच सर्व संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

दरम्यान, या प्रकरणातील संशयितांनी दाखल गुन्हा रद्द करावा यासाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून चौकशीला स्थगिती मिळवली होती. मात्र, खंडपीठाने तीन वर्षांपूर्वी दाखल झालेली ही याचिका 29 ऑगस्ट 2013 रोजी फेटाळली. ही याचिका फेटाळताच पा शनिवारी पहाटे 3 वाजेपासून भुसावळात अटकसत्र राबवले. पहाटे 5.15 वाजता विजय चौधरी यांना अटक करण्यात आली, तर माजी आमदार संतोष चौधरी व अन्य संशयित फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.