आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटकेत असलेल्या माजी आमदाराच्या वाढदिवसामुळे कारागृहाबाहेर बंदोबस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेले माजी आमदार संतोष चौधरी यांचा शनिवारी वाढदिवस असल्याने कारागृहाच्या बाहेर सर्मथकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन जिल्हा पोलिस दलातर्फे तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. गेल्या वर्षी चौधरी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या कार्यकर्त्यांसह सर्मथकांनी कारागृहाच्या परिसरात मोठा धुडगूस घातला होता. तसेच कारागृहाच्या व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर फटाक्यांची आतषबाजीदेखील केली होती. त्याचबरोबर त्याच दिवशी चौधरी यांची न्यायालयात सुनावणी असल्याने न्यायालयातदेखील या कार्यकर्त्यांनी धूम माजवली होती. त्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती.