आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षांचा ‘मेगा संडे’, ‘सीए’ परीक्षेला ४६९ विद्यार्थी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव शहरात रविवारी आयबीपीएस, एसबीआय, स्टाफ सिलेक्शन कमिशन, जिल्‍हा परिषद, सीएची अंतिम परीक्षा चित्रकलेची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या सर्व परीक्षांसाठी जिल्हाभरातून सुमारे सहा हजार परीक्षार्थी शहरात दाखल झाले होते. त्यामुळे शहरात दिवसभर परीक्षार्थींची गर्दी होती. तसेच रेल्वे, एस.टी. खासगी गाड्यादेखील फुल्ल होत्या. त्यामुळे रविवार हा परीक्षेचा ‘मेगा रविवार’ ठरला.
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियातर्फे सीए अंतिम परीक्षा आणि आयपीसीसी परीक्षेला जळगाव केंद्रावर शांततेत सुरुवात झाली. दोन्ही मिळून ४६९ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत.

सीएंच्या परीक्षा नोव्हेंबरपासून सुरू झाल्या आहेत. या परीक्षा २१ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहेत. यात सीए अंतिम वर्षासाठी १९७ विद्यार्थी तर आयपीसीसी परीक्षेसाठी २७२ विद्यार्थी बसले आहेत. मू. जे. महाविद्यालयात दुपारी दोन ते पाच या वेळेत ह्या परीक्षा होत आहे. रविवारीही परीक्षा सुरळीत पार पडली. या परीक्षेसाठी इन्स्टिट्यूटतर्फे सीए प्रवीण अचलिया, निखिल बेदमुथा, रवींद्र छाजेड, साहिल बालाणी, अजय हिंदूजा, धनंजय कुळकर्णी, रोहित यावलकर यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. टप्प्याटप्याने हे परीक्षा केंद्रांची पाहणी करीत आहे, अशी माहिती सीए असोसिएशनचे अध्यक्ष जयेश ललवाणी यांनी दिली.

स्टाफ सिलेक्शन परीक्षेला चार हजार परीक्षार्थी गैरहजर
स्टाफसिलेक्शन कमिशनतर्फे रविवारी घेण्यात आलेल्या कम्बाइन हायर सेकंडरी लेव्हल एक्झामिनेशनला ६३३६ विद्यार्थ्यांपैकी ४२४८ विद्यार्थी गैरहजर राहिले तर केवळ २०८८ जणांनी ही परीक्षा दिली. १२वी उत्तीर्णच्या पात्रतेवर ही परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा इंग्रजी किंवा हिंदी भाषेतून असल्यामुळेही स्थानिक विद्यार्थी परीक्षा देणे टाळतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. रविवारी सकाळी १० ते १२ आणि दुपारी ते या वेळेत दोन सत्रात शहरातील १० केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. विद्यार्थीच गैरहजर राहिल्यामुळे कोणत्याही प्रकारचा उत्साह दिसून आला नाही. गेल्या रविवारीही स्टाफ सिलेक्शनची परीक्षा झाली होती. त्या वेळी केवळ हजार ४०० जणांनी ही परीक्षा दिली. तर ४९०० विद्यार्थी गैरहजर राहिले होते.

कारण नसताना डावलले
सकाळी८.३० वाजेपर्यंत आत जाण्याची सूचना लावली होती. आम्ही वेळेत आलो. मात्र, कागदपत्र पूर्ण नसल्याचे कारण सांगून प्रवेश दिला नाही. परीक्षेसाठी वेळेत येऊनही कारण नसताना आम्हाला डावलण्यात आले. प्रियमभुतडा, अमळनेर

ओळखपत्र होते तरीही माघारी
*माझ्याकडे२०१३-१४चे महाविद्यालयाचे ओळखपत्र होते. तरीदेखील त्यांनी ओळखपत्र व्हॅलिड नसल्याचे सांगत प्रवेश दिला नाही. विनंती केल्यानंतरही परीक्षा देऊ दिली नाही. त्यामुळे माघारी जावे लागले. भारतीबडगुजर, यावल

*हॉल टिकीट होते. आधार कार्डचा नंबरही होता. पर्यवेक्षकांनी आधार कार्डचा नंबर तपासला नाही. सुरुवातीला थांबवून ठेवले. नंतर वेळेची मुदत संपल्याचे सांगून परीक्षेला बसू दिले नाही. -ईश्वरी बोरोले

पॅरेंट क्लब, रोटरी क्लब ऑफ ईस्ट आणि रोटरॅक्ट क्लब गोदावरीतर्फे रविवारी गणपतीनगरातील रोटरी हॉल येथे ‘तारे जमीं पर’ चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. यात जिल्हाभरातून ७०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी निसर्ग चित्रे, कार्टूनसह अनेक प्रबोधनात्मक चित्रे काढली होती. "अ' गटात भाविका भोई, "ब' गटात प्रथम ईश्वरी अत्तरदे तर "क' गटात हमिका अत्तरदे यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले.
धुळे येथे स्वतंत्र केंद्र
यंदापासूनधुळे येथे स्वतंत्र केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे जळगाव केंद्रावरील विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे.