आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Exam News In Marathi, Copy In HSC Exam In Jalgaon, Divya Marathi, Maharashtra

बारावीच्‍या इंग्रजी पेपरसाठी मोडली कॉपीमुक्‍तीची शपथ!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- बारावीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरला कॉपी करणार्‍या दहा जणांवर कारवाई करण्यात आली. शहरासह ग्रामीण भागात केंद्राबाहेर शुकशुकाट असला तरी आतमध्ये भरमसाठ कॉपी चालली. ‘गैर मार्गाशी लढा’ या अभियानांतर्गत कॉपी न करण्याची शपथ घेणार्‍या विद्यार्थ्यांनीच ती इंग्रजी विषयाच्या पेपरला मोडीत काढली.

बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातून 43 हजार 645 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. शुक्रवारी कठिण समजला जाणारा इंग्रजीचा पेपर झाला. शहरातील केंद्रांवर एकही कॉपी केस झाली नसलीतरी चुप्या पध्दतीने सर्रासपणे कॉपीचे प्रकार झाले. मात्र, परीक्षा काळात केंद्राबाहेर होणारा जमावावर अंकूश घालण्यास शिक्षण विभागाच्या मदतीने पोलिसांना यश आले आहे.

परीक्षा सुरू होण्याआधी केंद्रांवर गर्दी होती. मात्र, त्यानंतर शुकशुकाट दिसून आला. सहा भरारी पथकांनी शहरासह जिल्ह्यातील केंद्रांना भेटी देवून पाहणी केली. याव्यतिरिक्त जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांनी पेपर सुरू होताच नूतन मराठा महाविद्यालय आणि अँग्लो उर्दू हायस्कूलच्या केंद्रावर जावून पाहणी केली. या पेपरला दहा विद्यार्थ्यांवर कॉपी केस दाखल करण्यात आल्या. यात पारोळा तालुक्यातील बहादरपूरच्या शाळेत सहा विद्यार्थ्यांवर तर अमळनेरच्या जययोगेश्वर विद्यालयात एका विद्यार्थ्यावर डाएटच्या पथकाने कारवाई केली. धरणगाव कनिष्ठ महाविद्यालयाच्या केंद्रातील तीन विद्यार्थ्यांवर पथकाने कारवाई केली.

खिडक्यांमागे लपवल्या कॉपी
विभागीय शिक्षण मंडळाने कॉपीमुक्त परीक्षा अभियान हाती घेतले असून विद्यार्थ्यांकडून कॉपी न करण्याची शपथ घेण्यात आली होती. मात्र, या पेपरला ती मोडीत निघाली. केंद्रावर छुप्या पध्दतीने कॉपीचे प्रकार घडले. काही केद्रांवर बैठे पथकांच्या नजरा चुकवून तेथे नियुक्त कर्मचार्‍यांकडून भ्रमणध्वनीव्दारे माहिती पुरविण्यात आली. वर्गांच्या खिडक्यांना पुस्तक संच लावण्यात आल्याचे चित्रही दिसून आले.