आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Exam News In Marathi, Raid On Exam Center, Divya Marathi

‘माय मराठी’ला चार विद्यार्थ्यांवर कारवाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- कसून तपासणीबरोबरच छायाचित्रण व भरारी पथकांच्या नजरेमुळे बारावी परीक्षेतील पहिला मराठी पेपर कॉपीमुक्त झाल्याचा दावा शिक्षण विभागाने केला आहे. शहरात कॉपीप्रकरणी एकावरही कारवाई झाली नाही. धरणगाव येथील पी.आर. हायस्कूल या केंद्रावर चार विद्यार्थ्यांवर कारवाई झाल्याचे शिक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितले. शुक्रवारी इंग्रजीचा पेपर असल्याने पर्यवेक्षक, केंद्रप्रमुख, पथकांसह शिक्षण विभागाची कसोटी लागणार आहे. गुरुवारी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत मराठी व दुपारी तीन ते सहा या वेळेत उर्दू विषयाचा पेपर झाला. शहरातील 10 केंद्रांवर ही परीक्षा झाली. कुठेही कॉपीचा प्रकार उघडकीस आला नसल्याचे शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांनी सांगितले.

प्रवेशद्वारावर तपासणी
सकाळी 10.30 वाजेपासून परीक्षार्थींना केंद्रात सोडले जात होते. बॅग, पॅड व कपड्यांची कसून तपासणी घेण्यात आली. परीक्षा आवारात शिक्षकांनाही मोबाइलला बंदी घालण्यात आली होती. आधी प्रवेशद्वाराजवळ तपासणी यानंतर पुन्हा पेपर सुरू होण्याआधी जागेवरही विद्यार्थ्यांची तपासणी घेण्यात आली. सर्वच परीक्षा केंद्रावर छायाचित्रण करण्यात आले. प्रवेशद्वाराजवळ पोलिस कर्मचारी नियुक्त असल्याने बाहेरील व्यक्तींना प्रवेश बंदी केली होती.

शेवटच्या अर्धा तासात वातावरण सैल
सुरुवातीच्या दोन तासांत सर्वच केंद्रांवर कडक वातावरण दिसून आले. मात्र, शेवटच्या तासात विद्यार्थ्यांना सूट दिल्याचे चित्र नूतन मराठा, महाराणा प्रताप, केसीई शाळांमध्ये दिसून आले. पहिल्या दोन तासांच्या उत्साहानंतर पथकांचा व केंद्रप्रमुखांचा उत्साह शमला होता. पर्यवेक्षकांनीही शेवटच्या अध्र्या, पाऊण तासात विद्यार्थ्यांच्या हालचालीकडे दुर्लक्ष केले. परिणामी शेवटी शेवटी कॉपीला वाव मिळाल्याचेही दिसून आले. इंग्रजीच्या पेपरला विद्यार्थ्यांची कडक तपासणी केली जाणार असून यासाठी पथकेही वाढविण्यात येणार असल्याचेही शशिकांत हिंगोणेकर यांनी सांगितले.