आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Exam News In Marathi, SSC Exam Start From Today, Divya Marathi

आज दहावीचा मराठीचा पेपर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - दहावीच्या परीक्षेला सोमवारपासून मराठीच्या पेपरने प्रारंभ होत आहे. 3 ते 27 मार्च ही परीक्षा होणार आहे. नाशिक विभाग शिक्षण मंडळाने परीक्षेच्या वेळापत्रकात प्रत्येक विषयाची तयारी होण्याकरिता प्रत्येक पेपरआधी किमान एकदिवस मोकळा ठेवला आहे. यंदा जिल्ह्यातील 69,785 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
प्रशासनाची तयारी पूर्ण
जिल्ह्यात 121 केंद्रांवर 69,785 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यासाठी शाळांमध्ये बैठक क्रमांक टाकण्याचे काम रविवारी सायंकाळीच पूर्ण करण्यात आले आहे. प्रत्येक केंद्रावर बैठेपथक नियुक्त करण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे. एकूण केंद्रांपैकी 32 केंद्रे संवेदनशील असून त्यावर भरारी पथकांचे विशेष लक्ष राहणार आहे. सहा भरारी पथके गैरप्रकारांना आळा घालणार आहेत. एकाच दिवशी दहावी व बारावीचे पेपर आल्याने शिक्षण विभागाची काहीशी कसरत होणार आहे.
शिक्षण विभाग सज्ज
माध्यमिक शिक्षण विभागाची तयारी पूर्ण झाली आहे.‘गैरमार्गाशी लढा’ या अभियानावर भर दिला जाणार आहे. व्हिडिओ शूटिंगची व्यवस्था प्रत्येक केंद्रांवर केलेली नसली तरी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या पथकासोबत व्हिडिओ शूटर असेल. अनिल सोनार, उपशिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग.