आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षा पद्धतीत बदल आवश्यक : डॉ.दमाणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जागतिक पातळीवर विद्यार्थी स्पर्धेत टिकावेत, यासाठी परीक्षा पद्धतीत बदल करण्याची आवश्यकता असून, त्यासाठी विविध पर्याय तपासले जात आहेत. त्यातून विद्यार्थ्यांचे समग्र मूल्यांकन करणारी परीक्षा पद्धत निश्चितच अस्तित्वात येईल, असे इंदूर येथील प्राचार्या डॉ.किरण दमाणी मत यांनी व्यक्त केले.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागातर्फे मंगळवारी ‘परीक्षा पद्धतीतील नवप्रवाह’ या विषयावर राष्ट्रीय परिषदेला सुरुवात झाली. त्या वेळी डॉ.दमाणी बोलत होत्या. कुलसचिव डॉ.प्रा.ए.एम.महाजन अध्यक्षस्थानी होते. या वेळी डॉ.आर.एच.गुप्ता, अधिष्ठाता डॉ.एस.टी.भुकन, डॉ.आर.एल.शिंदे, नांदेड विद्यापीठाचे डॉ.ए.पी.जिंगिने उपस्थित होते.
डॉ.दमाणी म्हणाल्या की, प्रारंभी औपचारिक शिक्षण पद्धत आणि त्यानंतर अनौपचारिक पद्धत आपण स्वीकारली; परंतु त्यात काही दोष आढळून आले. त्यामुळे राधाकृष्ण आयोग व कोठारी आयोगाने काही नवे बदल केले. आजच्या परीक्षा पद्धतीत केवळ गुणांचा आग्रह धरला जातो; मूल्य शिक्षणाकडे फारसे लक्ष दिले जात नाही. तथापि, आता ओपन बुक परीक्षा, ऑनलाइन परीक्षा आणि ऑन डिमांड परीक्षा असे काही नवे आग्रह परीक्षापद्धतीत धरले जात आहेत. त्यातून चांगले पर्याय निश्चितच समोर येतील, असेही त्या म्हणाल्या. डॉ.मनीषा इंदाणी यांनी प्रास्ताविक, तर प्रीती चौधरी व प्रशांत साठे यांनी सूत्रसंचालन केले. चेतन बाविस्कर यांनी परिचय करून दिला.
विद्यार्थी केवळ परीक्षार्थी राहू नये
चॉइस बेस्ड क्रेडिट सिस्टीम काही विभागांमध्ये लागू केली असून, ती सर्वत्र लागू करण्याचा विचार आहे. विद्यार्थी हा केवळ परीक्षार्थी राहू नये, अशी अपेक्षा उमविचे कुलसचिव डॉ.ए.एम.महाजन यांनी व्यक्त केली.