आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टंकलेखन, लघुलेखन अभ्यासक्रमांना मुदतवाढ, टायपिंगची टक-टक 30 पर्यंत सुरुच राहणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - राज्यातील सर्व शासनमान्य मॅन्युअल टंकलेखन लघुलेखन अभ्यासक्रमांना ३० नाेव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात अाली अाहे. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण क्रीडा विभागाने गुरुवारी याबाबतचा अादेश काढला अाहे.

 

राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयातील कामकाजात संगणकांचा वापर करण्यासाठी शासनाने शासन मान्य वाणिज्य संस्थांमध्ये संगणक टंकलेखन अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी ३१ अाॅक्टाेबर २०१३च्या आदेशानुसार ३० नोव्हेंबर २०१५ पर्यंत टप्प्या टप्प्याने मॅन्युअल टंकलेखन अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला हाेता. त्याला ३० सप्टेंबर २०१५च्या शुद्धि पत्रान्वये ३१ मे २०१६पर्यंत मुदतवाढ देण्यात अाली हाेती. त्यानंतर १३ जुलै २०१६ला पून्हा शुद्धि पत्रान्वये ३१ मे २०१७पर्यंत पुन्हा मुदतवाढ देण्यात अाली हाेती.


दरम्यान, मॅन्युअल टंकलेखन बंद करण्याच्या शासना विराेधात उच्च न्यायालयात काही याचिका दाखल झाल्या हाेत्या. त्या पैकी १०२७३/२०१७ जनहित याचिका क्रमांक १००/२०१६मध्ये उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना त्यांचे म्हणणे शासनाकडे सादर करण्याबाबत निर्देश दिले हाेते. तसेच शासनाने याचिकाकर्त्यांच्या निवेदनाबाबत विचारविनिमय करून निर्णय, घ्यावा असे निर्देश शासनाला दिले हाेते. त्यानुसार याचिकाकर्त्यांच्या निवेदनावर विचारविनीमय करून मॅन्युअल टंकलेखन अभ्यासक्रम सुरु ठेवण्यास मुदतवाढ देण्यात अाली असल्याचे या विभागाच्या सहसचिव डाॅ. सुवर्णा खरात यांनी काढलेल्या अादेशात म्हटले अाहे. सर्व शासन मान्य टंकलेखन लघुलेखन वाणिज्य संस्थांनी टंकलेखनासाेबतच संगणक टंकलेखनाचा अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी अावश्यक ते बदल संस्थेत करून घ्यावे, असे अादेशात म्हटले अाहे. मुदतवाढीच्या मुदतीनंतर पुन्हा या संदर्भात अाढावा घेण्यात येणार अाहे.

बातम्या आणखी आहेत...