आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुटीत 25 जादा बसेस धावणार- राज्य परिवहन महामंडळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- उन्हाळी सुटी आणि लग्न समारंभाची गर्दी खेचण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने सर्वच आगारातून जादा बसेसचे नियोजन केले आहे. जिल्ह्यातील आगाराने रोजच्या नियोजनापेक्षा 25 गाड्या जादा सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

एप्रिल महिन्याच्या मध्यंतरास बहुतांश परीक्षा संपण्यात आल्या आहेत. दहावी, बारावीसह माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांच्या परीक्षा संपल्या आहेत. यासह वैशाखातील विविध सण, यात्रा, लग्न समारंभामुळे बस प्रवाशांची गर्दीही वाढली आहे. प्रवाशांची उपलब्धी लक्षात घेऊन महामंडळाने प्रवाशांच्या सोयीबरोबरच उत्पन्नवाढीसाठी जिल्ह्यातील 11 आगारातून प्रमुख शहरांसह जिल्हाभरासाठी नेहमीपेक्षा जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. जळगाव आगारातून नाशिकसाठी 5 फेर्‍या, पुण्यासाठी एक यासह प्रत्येक आगारातून एक ते दोन जादा बसेस सोडल्या जात आहेत.

महामंडळ प्रशासनाने 1 एप्रिल ते 30 जूनपर्यंतचा कालावधी यासाठी निश्चित केला आहे. तसेच मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांमधील काही शहरांपर्यंत बसेस सोडल्या जात आहेत. निवडणुकांनंतर उन्हाळी सुटीत गर्दी वाढेल, असा अंदाजही आगार प्रशासनाने व्यक्त केला आहे.