भुसावळ - गाेंदिया-काेल्हापूरमहाराष्ट्र एक्स्प्रेसला वाढीव डब्यांची गरज आहे. प्रवाशांची संख्या वाढूनही गाडीला पूर्वीप्रमाणेच १८ डबे जोडले जातात. या गाडीने पुणे काेल्हापूरला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने, वाढीव डबे जोडले जावेत, अशी मागणी होत आहे.
काळानुरूप रेल्वे प्रशासनाने अनेक गाड्यांना वाढीव डबे जोडले आहे. मात्र, महाराष्ट्र एक्स्प्रेसला पूर्वीप्रमाणेच १८ डबे जोडले जात आहेत. भुसावळ स्थानकावरून ही गाडी पुण्यासाठी संध्याकाळी वाजता सुटते. प्रवाशांच्या सोयीची गाडी असल्याने या गाडीला नेहमीच गर्दी असते. पहाटे वाजता ही गाडी पुण्याला पोहोचते. परिणामी अनेक प्रवासी दारात बसून धोकेदायक पद्धतीने प्रवास करतात. गाडीला दाेन ब्रेक डबे, तीन जनरल, १० अारक्षित तीन वातानुकूलित डबे जोडलेले असतात. त्यामुळे डब्यांची संख्या वाढणे अत्यंत आवश्यक आहे.
लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा आवश्यक
महाराष्ट्रएक्स्प्रेसमधील डब्यांची संख्या वाढवण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करणे आवश्यक आहे. सुदैवाने रेल्वेमंत्री सुरेश प्रभू महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रातील प्रवाशांच्या हिताचा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आहे.