आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Eye Witness Changed Side In Sonawane Murder Case

मारणारे मार खाणारे कोण होते; हे सांगता येणार नाही, सोनवणे खून खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फितूर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - विनायक सोनवणे खून खटल्यातील घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार हितेश रवींद्र पाटील याला न्यायालयाने बुधवारी फितूर घोषित केले.हितेश हा नूतन मराठा महाविद्यालयाचा विद्यार्थी तसेच शिव कॉलनी येथील रहिवासी आहे. घटनेच्या दिवशी तो परीक्षा देऊन महाविद्यालयातून घरी जात असताना त्याने लॉ कॉलेजच्या मैदानाजवळ झालेली घटना पाहिली होती. त्यानुसार त्याचा जबाब घेण्यात आला होता. बुधवारी त्याची साक्ष होती.
दरम्यान आपण शिव कॉलनीत राहत असल्यामुळे नगरसेवक विनायक सोनवणे या घटनेतील संशयित नाना पवन सूर्यवंशी यांना ओळखतो. घटनेच्या दिवशी लॉ कॉलेजच्या मैदानाजवळ दोन व्यक्ती एक व्यक्तीला तीक्ष्ण हत्याराने मारत होते हे आपण पाहिले आहे. मात्र, मारणारे किंवा मार खाणारे कोण होते ते सांगता येणार नाही, अशी साक्ष त्याने न्यायालयाला दिली. त्यामुळे त्याला फितूर घोषित करण्यात आले. सरकारी वकील गोपाल जळमकर यांनी त्याची उलटतपासणी घेतली. मात्र, त्यातही त्याने संबंधित मयत मारेकरी कोण होते ते सांगता येणार नाही, असे उत्तर दिले. पुढील सुनावणी १३ एप्रिल रोजी होणार आहे.

डॉक्टरांच्या साक्षीसाठी न्यायालयीन कमिशनर
मृतसोनवणे यांचे शवविच्छेदन करणारे सामान्य रुग्णालयाचे डॉ.गिरीश पाटील यांची साक्ष बुधवारी होणार होती. मात्र, ते आजारी असल्यामुळे होऊ शकली नाही. आता ते उपचार घेत असलेल्या रुग्णालयात जाऊन त्यांची साक्ष घेण्यात येणार आहे. यासाठी न्यायालयीन कमिशनर म्हणून अॅड.अकील इस्माईल यांची नियुक्ती केली आहे.