आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुक, व्हॉटस अपवर ‘काक फेस्टिव्हल’चा घास

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- एकेकाळी फ्रेंडशिप डे, व्हॅलेंटाईन डे, रोज डे यांपुरते मर्यादित असलेले फेसबुक आता मराठमोळे सण, उत्सव आणि परंपरांनाही साद घालू लागले आहे. अर्थात फेसबुकच्या भिंतींवरील या सणांनादेखील इंग्रजी रंग चढला असून, ‘पितृपक्षा’चा सांप्रत काळात ‘काक फेस्टिव्हल’ झाला आहे. फेसबुकपाठोपाठ ‘व्हॉटस अप’वरही आता या ‘काक फेस्टिव्हल’चा घास एकमेकांना भरवला जातो आहे.

एकविसाव्या शतकातील तरुणाईला सोशल नेटवर्कने प्रचंड झपाटले असून, आपल्या प्रत्येक भावभावना व्यक्त करण्यासाठीचे व्यासपीठ म्हणून त्याकडे बघितले जाते आहे. सण आणि उत्सवांच्या दिवसांत तर फेसबुकसारख्या सोशल नेटवर्कच्या भिंती अक्षरश: ग्रीटिंग्ज, फोटो आणि कमेंट्सने अक्षरश: शिगोशीग भरलेल्या असतात. यापूर्वी विदेशी उत्सवांबरोबर भारतीय सण-परंपरांवेळीच फेसबुकच्या भिंतींवर शुभेच्छांचा पाऊस पडायचा. आता पितृपक्ष सोशल नेटवर्कच्या जाळ्यात अडकल्या आहेत. काही दिवसांपासून सुरू असलेल्या पितृपक्षाचे घास फेसबुकवरच्या ‘कावळ्यां’ना भरविण्याचे दिव्य करून नेटिझन्सने फेसबुकला खर्‍या अर्थाने ‘सोशल’ केले आहे. पोस्ट्सला मिळणारे ‘लाइक्स’ व शेअर करणार्‍यांची संख्या बघता ‘फेस्टिव्हल’चा हा फंडा चांगलाच पचनी पडतो आहे.

पोस्ट सुग्रास भोजनाची
या ‘काक फेस्टिव्हल’मध्ये मुगाचे वडे, कढी, खीर, भजे, चार प्रकारच्या भाज्या, कोशिंबीर अशा सुग्रास भोजनाचा आस्वादही छायाचित्रांच्या माध्यमातून शेअर केला जातो आहे. काही मंडळी तर पित्रांचे ताट तयार झाल्या-झाल्या ते खाण्यापूर्वीच अतिउत्साहात त्याचे छायाचित्र काढून ते फेसबुकवर ‘पोस्ट’ करत आहेत.