आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Facebook News In Marathi, Yogesh Patil, Crime, Divya Marathi

फेसबुकवरून मुलीची छेड काढणार्‍यास जामीनावर मुक्तता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपीला न्यायालयात घेऊन जाताना पोलिस. - Divya Marathi
आरोपीला न्यायालयात घेऊन जाताना पोलिस.

जळगाव - फेसबुकवरून मुलीशी ओळख करून नंतर तिला अश्लील संदेश पाठविणारा योगेश प्रकाश पाटील याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली. त्याच्यावर कलम 112, 117 नुसार तक्रार दाखल करण्यात आली होती. जिल्हापेठ आणि रामानंदनगर पोलिस ठाणे हद्दीच्या वादामुळे योगेशवर कोणत्या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करावा याबाबत मंगळवारी बरीच चर्चा झाली.

अखेर जिल्हापेठ पोलिस ठाण्यात किरकोळ तक्रार दाखल झाली. पाटील याने छेड काढलेली मुलगी रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असल्यामुळे त्याला जामीन मिळाल्यानंतर पुन्हा रामानंदनगर पोलिस ठाण्यात आणले होते. तेथेही त्याला पोलिसी खाक्या दाखवून समज देऊन सोडण्यात आले.