आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळेल असे चिन्ह दिसत नाही, शरद पवारांची पुन्‍हा नोटबंदीवर टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - आम्ही सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांना नोटाबंदीच्या निर्णयावर पाठींबा दिला. मात्र या निर्णयाला सहा महिने उलटूनही सरकारला अपेक्षित काळा पैसा बाहेर निघाला का? असा प्रश्न शरद पवार यांनी चोपडा येथे बोलताना उपस्थित केला. विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी यांच्या अमृतमहाेत्सवी कार्यक्रमात ते बाेलत हाेते.
 
सहकारी बँकांच्‍या जुन्‍या नोटा बदलून देण्याची जबाबदारी नाबार्ड आणि रिझर्व्ह बँकेने घेतली नाही तर राज्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळेल अशी परिस्थिती कुठेही दिसत नाही. यामुळे महाराष्ट्राचा शेतकरी अस्मानी संकटात सापडला आहे, असे मत व्यक्त करून शरद पवार यांनी नोटाबंदी वर टीका केली आहे.
 
काय म्हणाले शरद पवार-  
- शेतीचे अर्थकारण संकटात
राज्यात कापसाच्या भावाची तक्रार  जास्त ऐकयला मिळाली नाही. तरीदेखील कापूस पीक सोडून अन्य कोणत्याही शेती उत्पादनाला भाव नसल्याने राज्याचा शेतकरी आर्थिक संकटात सापडून शेतीचे अर्थकारण संकटात आले आहे.
 
- कुण्याच्या शिव्या शाप नको म्हणून अगोदर कुंडली पाहतो
मी कोणत्याही बँकांच्या कार्यक्रमाना जात असताना ती बँक कशी आहे, त्याचा एनपीए कसा आहे, त्या बँकांची कुंडली पाहूनच मी कार्यक्रमांना जातो. आपल्‍याला कुणाच्याही शिव्या-शाप नको असेही शरद पवार यांनी आपल्या भाषणातून सांगितले.
 
- आम्ही पंच्‍याहत्‍तरी साजरी करणाऱ्यांनी आता पायउतार झाले पाहिजे
मी, सुशीलकुमार शिंदे आणि आता अरूणभाई तिघांनी वयाची पंच्‍याहत्‍तरी साजरी केली असून आता राजकारणातून पायउतार होऊन तरुणांना पुढे केले पाहिजे. फक्त जेष्ठ म्हणून सल्ला दिला पाहिजे,असे पवार म्हणाले.
 
विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, केंद्रीय मंत्री रामदास अाठवले सहकारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, माजी महसुलमंत्री एकनाथ खडसे अादींची या कार्यक्रमास उपस्थिती हाेती.
 
अरुणभाईकडून राजकारणातील संयम शिकलाे, त्‍यांच्‍या चिठ्ठया आजही संग्रही: फडणवीस
'राजकारणात आपण अनेक जणांकडून शिकत असतो. येथे संयमी राजकारणीच टिकताे. अरुणभाईकडून मी अनेक गुण शिकलाे. त्यात संयमीपणा हा सर्वात महत्वाचा गुण त्‍यांच्‍याकडून शिकलो. त्याचा अाता फायदा हाेत अाहे', अशी प्राजंळ कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
 
मुख्यमंत्री यांनी अवघ्या चार मिनिटांच्या भाषणात अरुणभाईंच्या गुणवैशिष्ट्यांची अाेळख करून दिली. यावेळी मुख्‍यमंत्री म्‍हणाले, 'विराेधी पक्षात असताना अरुणभाई हे विधानसभेचे अध्यक्ष हाेते. तेव्हाही संयम बाळगा, सखाेल अभ्यास करा, अशा सूचनांच्या चिठ्ठ्या ते मला पाठवत. त्या मार्गदर्शक असायच्या. अाजही त्या चिठ्ठ्या अापल्या संग्रही आहेत.'
 
बातम्या आणखी आहेत...