आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात भरदुपारी डीपी पेटली; तासभर वीजपुरवठा खंडित, उच्च दाब वाढल्याने जळाली केबल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - नटवर टॉकीज जवळील डीपीवरील केबलने गुरुवारी दुपारी ते २.३०च्या सुमारास अचानक पेट घेतला. त्यामुळे परिसरात तासभर वीज पुरवठा खंडित झाला होता. उच्च दाब वाढल्याने उष्णतेमुळे ही केबल जळाल्याचे क्रॉम्प्टन कंपनीच्या सूत्रांनी सांगितले.

नटवर टाॅकीजजवळ दुपारी डीपीच्या केबलने अचानक पेट घेतला. काही क्षणात छाेटी वाटणाऱ्या अागीने माेठे रूप धारण केले. हे लक्षात अाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी यािवषयी क्रॉम्प्टन कंपनीला माहिती दिली. त्यानंतर कर्मचारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी वीजपुरवठा खंडित केला. तितक्यात अग्नीशमन दलाचा बंब अाला त्यामुळे तात्काळ अाग विझली. त्यानंतर क्रॉम्प्टन कर्मचाऱ्यांनी केबल बदलून तासभरात वीजपुरवठा सुरळीत केला.